अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे ५ ला जेल भरो - परुळेकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 ऑक्टोबर 2017

कुडाळ - नोटिसांना न घाबरता अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच ठेवण्याचा कृती समितीने निर्णय घेतला आहे. ५ ऑक्‍टोबरला ओरोसमध्ये जेल भरो आंदोलन होईल, ही माहिती अंगणवाडी नेत्या कमल परुळेकर यांनी दिली.

कुडाळ - नोटिसांना न घाबरता अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच ठेवण्याचा कृती समितीने निर्णय घेतला आहे. ५ ऑक्‍टोबरला ओरोसमध्ये जेल भरो आंदोलन होईल, ही माहिती अंगणवाडी नेत्या कमल परुळेकर यांनी दिली.

त्यांच्या म्हणण्यानुसार सेवाज्येष्ठता आणि पुरेशी मानधनवाढ मिळेपर्यंत अंगणवाडी कर्मचारी संप मागे घेणार नाहीत; पण शासन ज्या पद्धतीने दडपशाही करीत आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. सरकार भाजप आणि शिवसेनेचे आहे. शिवसेनेने आपल्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. सरकारचा रिमोट कंट्रोल शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी मागण्या मान्य होईपर्यंत पाठीशी राहण्याचे ठरवले आहे. मुख्य म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्षांनी स्वतंत्र पत्रक काढून आपल्या लढ्याला पाठिंबा दिलाय. आणखी काय हवे? 

सरकारन नेमलेले पगारीा नोकर संप फोडण्यासाठी खोटेनाटे सांगतात, त्यास भीक घालू नका. सेवासमाप्तीच्या नोटीसा महाराष्ट्रातील सर्व प्रकल्पात देणे सुरु आहे. त्याची योग्यवेळी होळी करुच. ५ ऑक्‍टोबरला ओरोसला जेलभरो आंदोलन केले जाईल; पण सेवाज्येष्ठता आणि पुरेशी मानधनवाढ केल्याशिवाय संपातून माघार घेणार नाही असा निर्धार अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कटुता निर्माण करु नये. सिंधुदुर्गात अंगणवाड्या सुरु असल्याचा खोटा मॅसेज महाराष्ट्रभर सर्व जिल्ह्यातील प्रकल्प अधिकाऱ्यांना व्हॉटसअपवर पाठवून आमची बदनामी करुन आणि आता पाठविलेल्या नोटीसीत गैरव्यवहार हा शब्द टाकून ते स्वतःचेच हसे करुन घेत आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी कुठे दरोडा घातला की अफरातफर केली?

गैरव्यवहाराचा अर्थ कळतो का ? आम्ही त्यांना तो कोर्टात जावून समजावून देऊ. त्यांचे काम त्यांनी करावे. आमचे काम आम्ही करु, असा इशारा परुळेकर यांनी दिला आहे. या नोटीसा सर्वांना मिळाल्या की योग्यवेळी त्याची होळी करु. ५ ऑक्‍टोबरला ओरोसला जेलभरो आंदोलन करणार आहोत. सर्व महाराष्ट्रभर हे आंदोलन होणार आहे.

नोटीशीच्या भाषेला घाबरु नका. नव्या कर्मचाऱ्यांनी विचारावे की जुन्यांना परमनंट केलेल्या नोटीसा कधी दिल्यात का? कोणीही संपाला गालबोट लावू नका. तुमचा एकोपाच शासनाला धढा शिकवेल असे त्या म्हणाल्या.

 

Web Title: sindhudurg news Anganwadi workers protest