सर्वपक्षियांचे पाठबळ विजय देईल - अनिकेत तटकरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

सावंतवाडी - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासोबत भाजपसह शेकाप आणि आघाडीचे सर्व नेते माझ्या पाठिशी असल्यामुळे माझा विजय निश्‍चित आहे, असा दावा कोकण विधान परिषदेचे उमेदवार अनिकेत तटकरे यांनी आज येथे केला.

सावंतवाडी - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासोबत भाजपसह शेकाप आणि आघाडीचे सर्व नेते माझ्या पाठिशी असल्यामुळे माझा विजय निश्‍चित आहे, असा दावा कोकण विधान परिषदेचे उमेदवार अनिकेत तटकरे यांनी आज येथे केला.

निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी श्री. तटकरे मतदान केंद्राच्या परिसरात थांबले होते. यावेळी उपस्थित पत्रकारांनी त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी हा दावा केला आहे.

श्री. तटकरे म्हणाले, ""निवडणूक लढविण्याचा माझा पहिलाच अनुभव आहे. मी नवखा आहे; मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पाठिंबा दर्शवित आपलीच निवडणूक असल्याप्रमाणे मला सहकार्य केले आहे. त्यामुळे त्याचा फायदा निश्‍चितच होणार आहे. याठिकाणी त्यांच्या समवेत भाजपसह राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि आमदार जयंत पाटील यांचा शेकाप पक्ष माझ्या पाठिशी ठामपणे उभा राहीला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मला निश्‍चितच त्याचा फायदा होणार आहे.''

सर्वपक्षियांशी संबंध असल्याचा फायदा 
यावेळी श्री. तटकरे म्हणाले, ""माझे वडील सुनिल तटकरे हे राष्ट्रवादीचे नेते आहेत; मात्र समाजासाठी काम करीत असताना त्यांनी अनेक पक्षातील लोकांशी आपले संबंध चांगले ठेवले. त्याचा परिपाक होवून आज मला सर्वपक्षियांकडून पाठिंबा मिळाला असून माझा विजय निश्‍चितच आहे.'' 

Web Title: Sindhudurg News Aniket Tatakare Comment