#MonsoonTourism असनियेच्या धबधब्याला पर्यटकांची प्रतीक्षा

नीलेश मोरजकर
गुरुवार, 28 जून 2018

बांदा - सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या व निसर्ग सौंदर्याने नटलेल्या असनिये-कणेवाडी येथील धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाही झाला आहे. त्याला आता पर्यटकांची प्रतीक्षा आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा धबधबा आणि परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित होण्यासाठी स्थानिकांची मानसिकता तयार झाली असली, तरी त्याला राजाश्रय न मिळाल्याने हे सुंदर स्थळ दुर्लक्षित आहे. 

बारमाही पाण्याचे स्रोत असलेल्या या गावात शेती बागायती मोठ्या प्रमाणात आहे. गावात ८३ नैसर्गिक पाण्याचे बारमाही झरे आहेत. नैसर्गिक पाण्याबरोबरच दुर्मीळ वनौषधींनीही गाव समृद्ध आहे. या ठिकाणी जंगली प्राण्यांचा वावरही मोठ्या प्रमाणात आहे. गावात पट्‌टेरी वाघाचे दर्शनही ग्रामस्थांनी घेतले आहे. 

असनिये-घारपी मार्गावरील कणेवाडी येथील धबधबा पर्यटकांना भुरळ घालत आहे. असनिये-घारपी मार्गावरून या धबधब्याचे विहंगम दर्शन होते. डोंगरातून वाहणारा हा धबधबा असनिये गावाच्या सौंदर्यात अधिकच भर टाकतो. या धबधब्याकडे जाण्यासाठी पक्‍की वाट नसून जंगलातून मार्ग काढत या धबधब्याकडे जावे लागते. धबधब्याच्या पायथ्याशी पोहोचल्यावर या धबधब्याची भव्यता लक्षात येते. 

तब्बल ४० फुट उंचावरून दगडातून वाहणाऱ्या या धबधब्यामुळे पर्यटकही याकडे आकर्षित होतात. सुट्‌टीच्या दिवशी स्थानिकांसह परिसरातील पर्यटक या धबधब्याच्या ठिकाणी वर्षा पर्यटनाचा मरमुराद आनंद लुटण्यासाठी गर्दी करतात; मात्र याठिकाणी प्राथमिक सुविधाही नसल्याने पर्यटक नाराजी व्यक्‍त करतात. 

‘‘या धबधब्याचा पर्यटन दृष्टिकोनातून विकास करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पर्यटन विभागाकडे पाच वर्षापूर्वी प्रस्ताव पाठविला आहे. याबाबत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वेळोवेळी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्यात येत आहे. दोन वर्षे ग्रामपंचयायतीतर्फे धबधब्याकडे जाणारी पायवाट दुरस्ती केली जाते.’’
- गजानन सावंत,
माजी सरपंच, असनिये 
 
Web Title: Sindhudurg News Asaniye waterfall monsoon tourism