आता रविवारचा रेल्वेप्रवास टाळा

तुषार सावंत
रविवार, 1 जुलै 2018

कणकवली - रेल्वेमार्गावरील अपघात टाळण्यासाठी रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीची कामे आता रविवारी होणार आहेत. त्यामुळे रविवारी लांब पल्ल्याचा प्रवासाचा बेत असले, तर टाळावा लागणार आहे. भारतीय रेल्वेने दर रविवारी सहा तासांचा मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला असून, पावसाळ्यानंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे.

कणकवली - रेल्वेमार्गावरील अपघात टाळण्यासाठी रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीची कामे आता रविवारी होणार आहेत. त्यामुळे रविवारी लांब पल्ल्याचा प्रवासाचा बेत असले, तर टाळावा लागणार आहे. भारतीय रेल्वेने दर रविवारी सहा तासांचा मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला असून, पावसाळ्यानंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे.

भारतीय रेल्वे मार्ग अनेक राज्यांना आणि शहरांना जोडला आहे; मात्र या मार्गावरील काही तांत्रिक दुरुस्तीही महत्त्वाची आहे. काही ठिकाणी रेल्वे रुळ बदलणे, सिग्नल दुरुस्ती केली जाते; मात्र या कामांसाठी सातत्याने रेल्वे मार्गावर अडथळा येतो. त्यामुळे महत्त्वाची आणि तातडीची रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीची कामे रविवारी केली जाणार आहेत. रेल्वेच्या विभागनिहाय रविवारच्या सुटीच्या कालावधीत मेगा ब्लॉक घेऊन मार्ग सुरळीत आणि सुरक्षित केला जाणार आहे; मात्र ज्या मार्गावर मेगा ब्लॉक असेल तेथील रेल्वेगाड्यांना उशीर होणार असल्याने प्रवाशांना त्याची पूर्वकल्पना दिली जाईल. तसेच रेल्वेगाडी ज्या मार्गावर उिशराने धावेल तेथील स्थानकांवर प्रवाशांच्या खाणपानाची सेवा रेल्वेतर्फे केली जाईल. हे मेगा ब्लॉक फक्त रविवारीच असतील, असे रेल्वेने जाहीर केले आहे.  रेल्वेमंत्री श्री. गोयल यांनी नुकतीच रेल्वेच्या सातही विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन रेल्वे सुरक्षितेबाबत आणि नियमित वेळापत्रकानुसार गाड्या धावणेबाबत काही नियम घालून दिले आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

गाड्या वेळेवर धावण्याच्या प्रमाणात वाढ
गाड्या उशिराने धावल्या जबाबदार रेल्वे अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी गेल्या महिन्यात दिला होता. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात याचा अहवाल पाहिला, तर तर रेल्वे गाड्या वेळेवर धावण्याचे प्रमाण ६० टक्के वरून ७० टक्केवर आले होते. वेळा पाळण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे रेल्वेच्या अधिकारांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Sindhudurg News Avoid Sunday train travel