आंबा विक्रीसाठी स्वतंत्र जागा -  सावंतवाडी नगराध्यक्ष

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

सावंतवाडी - ग्रामीण भागातील आंबा व्यावसायिकांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी येथील पालिकेच्या माध्यमातून जागा उपलब्ध करुन देणार आहे. याबाबतचा निर्णय पालिकेने घेतल्याची माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली.

सावंतवाडी - ग्रामीण भागातील आंबा व्यावसायिकांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी येथील पालिकेच्या माध्यमातून जागा उपलब्ध करुन देणार आहे. याबाबतचा निर्णय पालिकेने घेतल्याची माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली.

यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपुर्णा कोरगावकर, नगरसेवक शुभांगी सुकी, भारती मोरे, आनंद नेवगी, सुरेंद्र बांदेकर, अनारोजीन लोबो आदी उपस्थित होते. 

श्री. साळगावकर म्हणाले, ""याठिकाणी ग्रामीण भागातील लोक मोठ्या प्रमाणात आंबे घेवून येतात; मात्र बाजारात नेहमी व्यापार करणाऱ्या लोकांकडुन त्यांच्याकडुन लूट केली जाते. ती थांबविण्यासाठी पालिकेने हा निर्णय घेतला आहे. आंबे व्यावसायिकांकडुन मागणी झाल्याप्रमाणे त्यांना आवश्‍यक त्याठिकाणी जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यांनी त्याठिकाणी कापडी स्टॉल उभारुन आंबे विक्री करावे; मात्र हे काम करीत असताना कागद आणि गवताचा कचरा करू नये, असा दंडक घालण्यात आला आहे.'' 

श्री. साळगावकर पुढे म्हणाले, ""जिल्ह्यात गावठी बाजार भरविण्याबाबत सगळीकडेच चर्चा आहे; मात्र सावंतवाडीत अनेक वर्षे हा बाजार सुुरू आहे. तरीही करवंदे, जांभ, जांभूळ, फणस अशा रानमेव्याला मार्केट मिळण्यासाठी संबंधित विक्रेत्यांना जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.'' 

दाखल्यासाठी स्वतंत्र कक्ष 
साळगावकर म्हणाले, ""शाळेच्या सुरवातीला लागणारे दाखले वेळेत मिळण्यासाठी प्रांताधिकारी व तहसिलदार कार्यालयात स्वतंत्र कक्ष उभारण्यात यावा, अशी मागणी आपण संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यानुसार कक्ष सुरू करण्यात येणार आहे; मात्र यावेळी पालकांनी जून, जुलैची वाट न बघता वेळेत दाखले काढुन घ्यावेत.'' 
 

Web Title: Sindhudurg News Baban Salgaonkar comment