रेल्वे स्थानकाला सावंतवाडी टर्मिनस नाव द्यावे -  बबन साळगावकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

सावंतवाडी - मळगाव येथे जाहीर झालेल्या टर्मिनसला योग्य तो दर्जा मिळण्यासाठी स्टेशनचे सावंतवाडी रोड स्टेशन असलेले नाव बदलून सावंतवाडी टर्मिनस असे करण्यात, यावे अशी मागणी आपण केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली आहे, अशी माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

सावंतवाडी - मळगाव येथे जाहीर झालेल्या टर्मिनसला योग्य तो दर्जा मिळण्यासाठी स्टेशनचे सावंतवाडी रोड स्टेशन असलेले नाव बदलून सावंतवाडी टर्मिनस असे करण्यात, यावे अशी मागणी आपण केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली आहे, अशी माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान शहरातील भूमिगत वीजवाहिन्याचे रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी आवश्‍यक असलेला निधी उपलब्ध करून द्यावा. त्यात वेंगुर्लेसह मालवण पालीकेला सुध्दा निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी आपण पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली, असेही यावेळी साळगावकर यांनी सांगितले.

श्री. साळगावकर यांनी आज याठिकाणी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपुर्णा कोरगावकर, नगरसेवक शुभांगी सुकी, भारती मोरे, आनंद नेवगी, सुरेंद्र बांदेकर, अनारोजीन लोबो आदी उपस्थित होते.

श्री. साळगावकर म्हणाले, ""मंत्री प्रभू याठिकाणी दौऱ्यानिमीत्त आले होते. यावेळी आपण त्यांच्याकडे टर्मिनसचे थांबलेले काम तात्काळ मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, या मागणीचे निवेदन दिले. त्याच बरोबर सावंतवाडी रेल्वे स्टेशनला योग्य तो दर्जा मिळण्यासाठी सावंतवाडी रोड स्टेशन हे नाव बदलून सावंतवाडी टर्मिनस असे देण्यात यावे अशी मागणी केली आहे. आपल्या तालुक्‍याला सैनिकी परंपरा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सैनिक देशसेवेसाठी काम करतात. त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना सोईचे व्हावे, यासाठी लांबपल्ल्याच्या गाड्या याठिकाणी थांबविण्यात याव्यात.''

श्री. साळगावकर म्हणाले, ""शहरातील वीजवाहिन्या भूमिगत करण्यासाठी योजना मंजूर झाली आहे; मात्र त्यावेळी खोदण्यात आलेले रस्ते पुर्ववत करण्यासाठी कोणताही निधी नाही. त्यामुळे हे रस्ते पुन्हा डांबरीकरण करण्यासाठी आपण निधी उपलब्ध करुन देवू, असे आश्‍वासन पालकमंत्री केसरकर यांनी जिल्हा नियोजनच्या बैठकीत दिले होते. त्याबाबत योग्य तो विचार करण्यात यावा. सावंतवाडीसह वेंगुर्ले आणि मालवण पालिकेला सुध्दा हा निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी आपण केसरकर यांच्याकडे केली आहे.''

...तर हॉस्पीटलला दात्याचे नाव 
श्री. साळगावकर म्हणाले, ""सावंतवाडीत मल्टीस्पेशालीस्ट हॉस्पीटल करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. त्यासाठी पन्नास एकर जागेची गरज आहे. यासाठी कोणी दात्याने पुढाकार घ्यावा, त्या व्यक्तीचे नाव संबंधित रुग्णालयाला देण्यात येईल. त्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे साळगावकर यांनी सांगुन यापुढचा माझा अजेंडा हॉस्पीटल उभारण्यासाठीच असणार आहे.''

Web Title: Sindhudurg News Baban Salgaonkar Press