कुडाळ तालु्क्यात सापडले बिबट्याचे पिल्लू

अजय सावंत
मंगळवार, 9 जानेवारी 2018

कुडाळ - भुकेलेल्या एक महिन्याच्या बिबट्याच्या पिलाला तेंडोली ग्रामस्थांनी वनखात्याच्या ताब्यात दिले. आज सकाळी जंगलमय भागातून हे पिल्लू रस्त्यावर तेंडोली कुंभारवाडी येथे आले होते.  

कुडाळ - भुकेलेल्या एक महिन्याच्या बिबट्याच्या पिलाला तेंडोली ग्रामस्थांनी वनखात्याच्या ताब्यात दिले. आज सकाळी जंगलमय भागातून हे पिल्लू रस्त्यावर तेंडोली कुंभारवाडी येथे आले होते.

तेंडोली हा परिसर जंगलाने व्यापलेला आहे. या बागात बिबट्या वाघ इतर प्राण्यांचा वावर आहे. काही महिन्यापूर्वी तेंडोलीमध्ये बिबट्या वाघही सापडला होता. गावाच्या वरच्या बाजूला जंगल आहे. आज सकाळी भुकेलेल्या स्थितीत असणारे बिबट्याचे एक महिन्याचे पिल्लू ग्रामस्थांच्या नजरेस पडले. त्यांनी लगेच कुडाळ येथील राजन नाईक यांना कळविले. घटनास्थळी सरपंच भाऊ पोतकर, पोलिसपाटील संजय नाईक, विजय प्रभू, तलाठी गावडे, ग्रामस्थ होते. 

याबाबतची कल्पना पोलिस विभाग निवती व वनखात्याला देण्यात आली. निवती पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय बाकारे, वनखात्याचे श्री. सावंत घटनास्थळी आले. हे पिल्लू वनखात्याच्या ताब्यात देण्यात आले.

Web Title: Sindhudurg News baby Leopard found in Kudal taluka