ढगाळ वातावरणामुळे आंबा बागायतदार चिंतेत

कृष्णकांत साळगावकर 
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

देवगड - राज्यभरात विविध ठिकाणी आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. सिंधुदुर्गमधेही हीच स्थिती असून काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरीही कोसळल्या आहेत. या वातावरणामुळे मात्र बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.

देवगड - राज्यभरात विविध ठिकाणी आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. सिंधुदुर्गमधेही हीच स्थिती असून काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरीही कोसळल्या आहेत. या वातावरणामुळे मात्र बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.

किनारपट्टीला वाऱ्याची गती देखील वाढली आहे. ढगाळ वातावरणामुळे किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता वाढते. आंब्यावर तुडतुडे, फळे शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव होतो. यासाठी शेतकऱ्यांना फवारणी करावी लागते. यामुळे उत्पादन खर्चात वाढ होते. 

ढगाळ वातावरण एक दोन दिवस राहीले तर मोठ्या नुकसानीची शक्‍यता आहे. फवारणी करावी लागल्यास उत्पादन खर्चात वाढ होऊ शकते. हे वातावरण किती दिवस राहते यावर नुकसान अवलंबून आहे. आत्ताच काही सांगता येणार नाही.
- अजित गोगटे,
आंबा बागायतदार, देवगड 

वारे वाढले तर आंब्याचा मोहर आणि फळे गळून पडतात. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतत वाढ झाली आहे. गेल्यावर्षी कोकणात थोडा उशिरापर्यंत मान्सूनचा पाऊस होता. त्यानंतर परतीचा पाऊसही मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतीला फटका बसला होता. अशावेळी शेतकऱ्यांना आंबा, काजू फळबागांचा आधार वाटत होता. पण हवामानातील बदलामुळे आंबा पिकास पालवी उशिराने आली. साहजिकच आंबा उत्पादन महिनाभर लांबण्याची शक्‍यता आहे. त्यातच आता ढगाळ वातावरणामुळे चिंता वाढली आहे. लवकर आंबा पीक आले तर दर चांगला मिळतो. तेवढा अधिक नफा शेतकऱ्यांना होत असतो. 

मार्चमध्ये आंबा तयार झाला तर 2500 ते 3000 प्रति पेटी दर मिळतो. पण मार्च अखेरीस आंबा दरात घट होते. साधारण 1800 ते 2000 पेटी असा दर मिळतो. 

 

Web Title: Sindhudurg News Bad weather affects on agriculture