सावंतवाडीत थर्माकोल मखर हद्दपार - पालिकेचा निर्णय

भूषण आरोसकर
गुरुवार, 28 जून 2018

सावंतवाडी - प्लास्टिकसोबत थर्माकोलच्या मखरांवर येथील पालिकेने बंदी आणून पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या पुढचं पाऊल टाकले आहे. राज्यात यंदा थर्माकोलला मखरांपुरती दिलेली सूट येथील पालिकेने मात्र नाकारली. यंदा चतुर्थी सणाला प्लास्टिकसोबत थमार्कोल मिळणेही पूर्णपणे दुरापास्त होणार आहे.

सावंतवाडी - प्लास्टिकसोबत थर्माकोलच्या मखरांवर येथील पालिकेने बंदी आणून पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या पुढचं पाऊल टाकले आहे. राज्यात यंदा थर्माकोलला मखरांपुरती दिलेली सूट येथील पालिकेने मात्र नाकारली. यंदा चतुर्थी सणाला प्लास्टिकसोबत थमार्कोल मिळणेही पूर्णपणे दुरापास्त होणार आहे.

राज्यभर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी पूर्णपणे प्लास्टिक बंदीची घोषणा केली. तसे आदेशही दिले; मात्र प्लास्टिकसोबत थर्माकोलवरही बंदी घालण्यात आली; मात्र अवघ्या दीड महिन्यावर असलेल्या चतुर्थी सणाचा विचार करता थर्माकोलच्या मखरांना सुट देण्यात आली. यामध्ये जे लोक मखर वापरात आणणार आहेत. किंवा विकत घेणार आहेत, त्या नागरिकांनी तसेच मंडळांनी ते मखर कचरा विल्हेवाट करणाऱ्या प्राधिकरणाकडे परत करावेत, असे जाहीर करण्यात आले होते. याबाबतची माहितीही पर्यावरण मंत्री श्री. कदम यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती; मात्र येथील पालिकेने प्लास्टीक सोबत मखरांनाही बंदी घातली. शिवाय ही बंदी यंदाच्या चतुर्थी सणातही कायम ठेवण्यात येणार असल्याचे शहरात जाहीर करण्यात आले आहे.

याबाबत नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना दुजोरा दिला आहे. यंदा प्लास्टीक बंदी बरोबरच थर्माकोलच्या साहित्याना बंदी असून, प्लास्टीक आणि थर्माकोल वापरात आणण्याऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. ही बंदी व कारवाई चतुर्थीसणातही कायम असणार आहे. यामुळे थर्माकोलच्या बाजारपेठवर चांगलाच परिणाम होण्याची शक्‍यता आहे. 

इको फ्रेंडली मखरांची बाजारपेठ भरणार
शहरात आता गणपती सणाला थर्माकोलच्या मखराऐवजी अन्य इको फ्रेंडली मखरांचा सामावेश असणार आहे. इको फ्रेंडली सजावट करण्यात येणार आहे. शहरातील घरोघरी गणेशोत्सवासाठी बाजारात वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून इको फ्रेंडली बाजारपेठ दिसून येईल.

Web Title: Sindhudurg News ban on tharmacol