बोडदेतील कालवा पूल "ब्लॅक स्पॉट'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

दोडामार्ग - बोडदेतील कालवा पूल ब्लॅक स्पॉट बनले आहे. खचलेला पुलाचा भाग पावसाळ्याआधी भरून न घेतल्यास अपघातांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे तिलारी प्रकल्पाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये, मोठा अपघात घडण्याआधी पूल सुरक्षित बनवावा, अशी मागणी केली आहे.

साटेली भेडशी ते बोडदे मार्गावर तो पूल आहे. तिलारीच्या गोव्याकडे जाणाऱ्या कालव्यातून लहान पोटकालवा काढून पाणी बोडदेकडे नेले जात आहे. तो कालवा साटेली भेडशीहून बोडदेकडे जाणाऱ्या रस्त्याला छेदून जातो. कालवा खोदल्यावर तेथे पूल बांधण्यात आला; पण भराव मजबूत नसल्याने पुलाचा भाग खचला आहे. दोन्हीकडचा रस्त्याचा भाग उंच तर पुलाचा भाग खळग्यात अशी स्थिती आहे. या मार्गावरून एसटी गाड्या, माल वाहतूक करणारे ट्रक अव्याहतपणे धावत असतात. त्यामुळे त्या खळग्याच्या दोन्ही बाजूचा रस्ताही खराब झाला आहे. काही दिवसांपुर्वी पाऊस पडला तेव्हा त्या खळग्याच्या खोलीचा पाण्यामुळे अंदाज न आल्याने दोन दुचाकीस्वार पडले आणि किरकोळ जखमी झाले.

पावसाळ्यापुर्वी उपाययोजनांची मागणी
पावसाळ्यात असे अनेक अपघात घडू शकतात. त्यात एखाद्याचा गंभीर अपघातही होऊ शकतो. त्यामुळे तिलारी प्रकल्पाधिकाऱ्यांनी तो खळगा भरून घ्यावा आणि संभाव्य अपघात टाळावेत, अशी मागणी बोडदेवासियांनी केली आहे.

Web Title: Sindhudurg News Bodade canal Bridge Black Spot