काळसेत प्लास्टीकपासून वीटनिर्मिती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

कुडाळ - धामापूर येथील स्यमंतक संस्थेच्या माध्यमातून प्लािस्टकपासून विटनिर्मितीचे प्रात्यक्षिक नुकतेच दाखविण्यात आले. शिवाजी विद्यामंदिर काळसेच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिक न जाळता त्याच्यापासून विटा बनविण्याचा संकल्प केला.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मधील मोठे तलाव म्हणून धामापूर तलाव ओळखले जाते. शिवकालीन पूर्व १५३० ला लोकांनी बंधारा घातला व या बंधाऱ्यामुळे या तलावाची निर्मिती झाली. तलावाला धरून धामापूर गावाची रचना उत्तमरित्या केली गेली.

तलावापासून गावाची वस्तू ही खाली असल्याने कोणत्याही मोटारशिवाय तलावातील पाणी काळसे व धामापूर गावाला अजूनही पुरविले जाते. अशा या सुंदर तलावाच्या आसपास जैवविविधता प्रचंड प्रमाणात आहे. या तलावाची जपवणूक करणे गरजेचे आहे. 

प्लास्टिकमुळे तलाव परिसरातील जैवविविधता धोक्‍यात येत आहे. प्लास्टीकची विल्हेवाट ही फार मोठी समस्या गावासमोर आहे. शहरामध्ये नगरपालिका प्लािस्टक कचरा घेऊन जाते व त्याची विल्हेवाट लावते. तरीसुद्धा प्लास्टिकचे अवशेष पूर्णपणे जळत नाहीत. हेच प्लास्टिक तलाव, ओहोळ, नदीद्वारे समुद्रात जाते. समुद्रातील मासे ते खातात व हे मासे परत आपण खातो. त्यातून विविध आजार बळावतात.  

धामापूर तलावाच्या संवर्धनाच्या दिशेने पहिले पाऊल म्हणून गावातील संस्था, गावातील तरुण मंडळी, शिवाजी विद्यामंदिर काळसे व स. का. पाटील कॉलेजमधल्या मुलांनी गांधी जयंतीचे औचित्य साधून धामापूर तलाव परिसरातील प्लास्टिक गोळा करण्याचे कार्य केले. प्लास्टिकची विल्हेवाट करण्याकरीता प्लास्टिकपासून वीट बनविण्याचे प्रात्यक्षिक स्यमंतक संस्थेतील विद्यार्थ्यांनी दाखविले. शिवाजी विद्यामंदिर काळसेमधील मुलांनी शाळेत व घरात प्लािस्टकचा कमीत कमी वापर करण्याचा संकल्प केला व शाळेत येणाऱ्या प्लािस्टक हे न जाळता त्यापासून विटा शाळेतच बनविण्याचा दृढ निश्‍चय केला.

Web Title: sindhudurg news Brick creation from plastic