सिंधुदुर्ग जिल्ह्यात बीएसएनएलचे इंटरनेट ठप्प

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यातील बीएसएनएलची इंटरनेट सेवा  आज जिल्हाभर बंद होती. खासगी नेटवर्कही सेवा विस्कळीत झाली होती. यासोबतच जिल्ह्याच्या अनेक भागात वीज पुरवठा खंडीत असल्यामुळे प्रशासकीय कामावर याचा मोठा परिणाम झाला. 

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यातील बीएसएनएलची इंटरनेट सेवा  आज जिल्हाभर बंद होती. खासगी नेटवर्कही सेवा विस्कळीत झाली होती. यासोबतच जिल्ह्याच्या अनेक भागात वीज पुरवठा खंडीत असल्यामुळे प्रशासकीय कामावर याचा मोठा परिणाम झाला. 

जिल्ह्यात आज सकाळपासून बीएसएनएलची इंटरनेट सेवा बंद होती. गेले काही दिवस वारंवार असा प्रकार घडत आहे. खासगी इंटरनेट सेवाही अनेक भागात विस्कळीत होती. या सगळ्याचा सर्वाधिक परिणाम शासकीय कामकाजावर जाणवला. जिल्हा मुख्यालयात मोठी गैरसोय झाली. विज मंडळाच्या खंडीत असलेल्या प्रवाहामूळे जिल्हा मुख्यालयासह अन्य पंचक्रोशीतील खासगी उद्योग, शासकीय कामकाज सेवा, कार्यालये, बॅंका, सोसायटी यांचे कामकाज पुर्णपणे ठप्प झाले आहे. ऑनलाईन प्रणालीमुळे थेट संगणकाच्या कामकाजावर सामान्य माणसांची मात्र परवड होताना दिसत आहे. यापार्श्‍वभूमीवर बीएसएनएल कार्यालयांकडे बॅंकांनी नेटवर्क सुरळीत करण्याबाबत पत्रव्यवहार केले आहेत; मात्र या प्रकरणाची दखल अद्याप घेतली गेलेली नसल्याने बीएसएनएल विरोधात संतापाची लाट उसळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

गेली अनेक दिवस वीजप्रवाह खंडीत होणे आणि महामार्गाचा चौपदरीकरणाच्या कामात केबल तुटत असल्याने टेलिफोन, मोबाईल सेवा पुर्णपणे ठप्प होणे असे प्रकार घडत आहेत. जिल्हा मुख्यालय येथे कामकाजासाठी येणाऱ्या सर्वसामान्य जनतेला  याचा मोठा फटका बसत आहे. सातबारा व विविध प्रकारची कागदपत्रे मिळवण्यावर याचा परिणाम झाला आहे. शासकीय यंत्रणा पेपरलेस तसेच ऑनलाईन करण्यासाठी गेल्या दोन-तीन वर्षांपासून पावले उचलली आहेत. राज्यात हा जिल्हा या क्षेत्रामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. दैनंदिन कामकाजासह इतर शासकीय कामे संगणकावरच अवलंबून आहेत. शासनाच्या या धोरणात्मक निर्णयाचा फटका सामान्य जनतेला व शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

राज्यभरात शाळांच्या परिक्षा संपल्यानंतर विविध शहरातून
चाकरमानी स्वतःच्या गावी मोठ्या प्रमाणात येत आहेत. शासकीय कामकाजाची कागदपत्रे सादर करण्यासाठी एक दीड महिना वेळ मिळतो. चाकरमान्यांसाठी खंडीत विज व टेलिफोन सेवेमुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

Web Title: Sindhudurg News BSNL network problem