कुडाळात अडीच लाखांचे कॅमेरे पळविले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

कुडाळ - जिल्ह्यात फोटो स्टुडिओ फोडण्याची चोरट्यांची मालिका सुरूच आहे. भर बाजारपेठेतील त्रिमूर्ती फोटो स्टुडिओ व आदर्शती ब्युटी पार्लर अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे अडीच लाखांचे कॅमेरे लांबविले. काही दिवस फोटो स्टुडिओ फोडल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

कुडाळ - जिल्ह्यात फोटो स्टुडिओ फोडण्याची चोरट्यांची मालिका सुरूच आहे. भर बाजारपेठेतील त्रिमूर्ती फोटो स्टुडिओ व आदर्शती ब्युटी पार्लर अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे अडीच लाखांचे कॅमेरे लांबविले. काही दिवस फोटो स्टुडिओ फोडल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांना तपासाच्या दृष्टीने अद्याप यश आले नाही. सिंधुदुर्गात काही दिवसांत जामसंडे, मालवण, बांदा येथे फोटो स्टुिडओ फोडण्याच्या घटना ताज्या असतानाच सोमवारी (ता.२१) रात्री पुन्हा एकदा चोरट्यांनी त्रिमूर्ती फोटो स्टुिडओ फोडला.

फोटोग्राफर दत्ता देशमुख यांचा त्रिमूर्ती फोटो स्टुिडओ आहे. रात्री स्टुिडओ बंद करण्यात आला. देशमुख हे बाहेर असल्याने स्टुिडओचे कामकाज त्यांच्या पत्नी बघतात. आज सकाळी स्टुडिओत काम करणारी मुलगी आली. तिला शटरचे दोन्ही लॉक तोडलेले दिसले. तत्काळ तिने देशमुख यांच्या घरी फोन करून कळविले. याबाबतची कल्पना येथील पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलिस दाखल होऊन पंचनामा केला.

फोटो स्टुडिओचे शटर तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. तसेच स्टुडिओच्या बाजूची लोखंडी जाळी तोडली. स्टुिडओतील मॅन्युअलट्रोन कॅमेरे डिजिटल दोन कॅमेरे, फ्लॅश, कार्ड आदी साहित्य लांबवले. स्टुडिओतील साहित्य अस्ताव्यस्त टाकले. चोरट्यांनी एसटी स्टॅण्डनजिकच असणारे आदर्शनी ब्युटीपार्लर फोडले. चोरट्यांनी येथील कॉस्मेिटक साहित्य लांबविले. 
चोरीचे वाढते प्रमाण

गेल्या काही दिवसांत चोरट्यांनी फोटो स्टुिडओकडे लक्ष केंिद्रत केले आहे. शहरात अलीकडेच मनीष फोटो स्टुडिओ फोडून चोरट्याने लाखो रुपये किमतीचे कॅमेरे लांबविले. संबंिधत चोरटा हा माहीतगार असावा त्यादृष्टीने तपास होणे गरजेचे आहे.
 

Web Title: Sindhudurg News camera stolen incidence in Kudal