चराठा प्राथमिक शाळा क्र. १ ला ‘ओजस’ मानांकन

भूषण आरोसकर
शुक्रवार, 23 मार्च 2018

सावंतवाडी - राज्याने जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्याच्या दृष्टीने काम सुरू केले आहे. राज्यातील पहिल्या १० आंतरराष्ट्रीय दर्जाचा शाळांमध्ये चराठा शाळा क्रमांक १ ला स्थान मिळाले आहे. नाविन्यपूर्ण उपक्रम व दर्जेदार शैक्षणिक सुविधेच्या जोरावर हे यश त्यांना साध्य झाले आहे. आता येथे नवा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे.

सावंतवाडी - राज्याने जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्याच्या दृष्टीने काम सुरू केले आहे. राज्यातील पहिल्या १० आंतरराष्ट्रीय दर्जाचा शाळांमध्ये चराठा शाळा क्रमांक १ ला स्थान मिळाले आहे. नाविन्यपूर्ण उपक्रम व दर्जेदार शैक्षणिक सुविधेच्या जोरावर हे यश त्यांना साध्य झाले आहे. आता येथे नवा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे.

ग्रामीण भागातील हे शाळेचे कार्य पाहून त्याला ओजस मानंकनाच्या यादीत स्थान मिळविले आहे. टप्प्याटप्प्याने १०० शाळांना आंतरराष्ट्रीय शाळा करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. अशा आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होण्यासाठीचा शोध सुरू झाला असून पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातून ३ शाळांची निवड झाली आहे. यासाठी शाळेच्या विविधांगी उपक्रमाच्या दखल घेण्यासोबतच शिक्षका सोबत मुख्याध्यापकाला या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नवीन अभ्यासक्रमासाठी (पी आय एस ए) परीक्षा द्यावी लागली. यात झालेल्या मूल्यमापणात ८२.२० टक्के गुण या शाळेने प्राप्त केले.

परीक्षेसाठी मुख्याध्यापक वर्षा देसाई, शिक्षक जयश्री पेडणेकर, अनघा निरवडेकर, बापूशेट उर्फ सतीश कोरगावकर, निलांगी गावडे, श्रावणी सावंत या परिक्षेसाठी गेल्या होत्या. त्याच्या सोबत सरपंच रघुनाथ वाळके व समिती शाळा समिती अध्यक्ष नुतन बोंद्रे या उपस्थित होत्या. तर उपसरपंच जॉनी फेराव,  केंद्रप्रमुख प्रमोद पावसकर, शाळा समिती उपाध्यक्ष रघुनाथ सावंत, सदस्य पुरुषोत्तम परब, माता पालक संघ शिक्षक संघ सर्व सदस्य चे पदाधिकारी लोणावळा येथे ९ जानेवारीला उपस्थित राहिले होते. 

सीबीएसईच्या धर्तीवर हा अभ्यासक्रम व त्यासाठी स्वतंत्र पुस्तके, इंग्रजीवर प्रभुत्वासाठी मार्गदर्शन, भारतीय मूल्यांची शिकवण, आंतरराष्ट्रीय गुणवत्ता विभाग विद्या प्राधिकरण पुणे यांच्यामार्फत कार्यक्षम व गुणवत्तापूर्ण शिक्षकांची निवड ही याची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या 
शाळांकडे मूले आकर्षित होण्यासाठी ही संकल्पना रूजू लागल्यास त्याचा नक्की फायदा होईल.

सुरवातीला या शाळेत हा अभ्यासक्रम पहिली ते तिसरी पर्यंत राबविला जाणार असून पुढे हे वर्ग वाढविण्यात येणार आहेत. निवड झालेल्या या शाळांना कौतुक करण्यासाठी उपमुख्यकार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी नुकतीच या शाळेला भेट दिली. यामुळे जिल्हा परिषदेकडे पाठ फिरविणाऱ्याच्या विद्यार्थ्यांची संख्या पुन्हा शाळेकडे वाढेल, अशी अपेक्षा आहे.

खाजगी व इंग्रजी माध्यमाच्या शाळातील विद्यार्थीही आता पुन्हा मराठी व जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेण्याकडे कल दाखवतील. नविन पुढच्या प्रवेश प्रक्रियेनुसार शिशु वाटिकाही सुरू करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत; मात्र अंगणवाडीच्या धोरणाबाबत अद्याप कोणतीही ठोस निकष जाहीर करण्यात आलेले नाहीत.

शाळेमध्ये वर्ग सजावट स्पर्धा, एक दिवस गावासाठी, विज्ञान प्रदर्शन, इंग्रजी नाट्टीकरण, वेशभूषा स्पर्धा, संविधान दिनाला विशेष कार्यक्रम, सर्व धर्म समभाव विषयक उपक्रम, तसेच या शाळेने शैक्षणिक उठवातून सुविधाची पूर्तता करण्यातही या शाळेने यश मिळविले आहे, शिक्षक वर्गासाठीही वेगळे स्वच्छतागृह या शाळेने उभारले आहे.

‘तेजस’ निवडल्या जाणार
ओजस शाळांच्या निवडीनंतर आता आणखी वेगळ्या निकषाच्या तेजस शाळा निवडल्या जाणार आहेत. याची संख्या ओजसच्या तुलनेत जास्त असेल. त्याला मार्गदर्शनाची जबाबदारी ओजस शाळांकडे असणार आहे.

Web Title: Sindhudurg News Charatha Primary School Ojas rating