चौपदरीकरणासाठी वाढीव निधीची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

कुडाळ - कसाल ते झाराप दरम्यान महामार्ग चौपदरीकरणातून उद्‌भवणाऱ्या विविध समस्या निवारण्यासाठी वाढीव प्रकल्पासाठी शंभर कोटीची मागणी भाजपतर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करणार आहे, अशी माहिती भाजप तालुकाध्यक्ष चारूदत्त देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

मुंबई- गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. ऐन पावसाळ्यात प्रवाशी, वाहनचालक यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत आवश्‍यक उपाययोजनांच्या दृष्टीने श्री. देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली. 

ते म्हणाले, ""पावसाळ्यात अनेक प्रवाशी वाहनचालकांना कसरत करून महामार्ग पार करावा लागत आहे. अशी परिस्थितीत प्रवाशी वर्गाना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत भाजपच्यावतीने दिलगिरी व्यक्त करीत आहोत.  महत्वाचे प्रश्‍न मार्गे लावण्यासाठी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्याकडे वाढीव प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून निधी मिळावा ही आम्ही मागणी केली आहे. ओव्हरब्रीज बॉक्‍सवेल आदीबाबत श्री. गडकरी यांच्या माध्यमातून कुडाळ शहराचा प्रश्‍न सोडपविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. याबाबत संबंधीत विभागाचे अधिकारी यांच्याशी लवकरच चर्चा केली जाईल.''

प्रवक्ते काका कुडाळकर, राजू राऊळ, प्रभाकर सावंत, नगरसेविका उषा आठल्ये, प्रशांत राणे, देवेंद्र सामंत, बंड्या सावंत, विजय कांबळी, निलेश तेंडोलकर आदी उपस्थित होते. 

Web Title: Sindhudurg News Charudatta Desai Press