वायरीत दीड वर्षाच्या मुलीचा गाडीखाली मृत्यू

वायरीत दीड वर्षाच्या मुलीचा गाडीखाली मृत्यू

मालवण - दीड वर्षाच्या बालिकेचा मोटारीखाली सापडल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना वायरी मारुती मंदिर नजीकच्या रस्त्यावर घडली. लावण्या गणपत वेंगुर्लेकर असे मृत बालिकेचे नाव आहे. सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात घडला.

वायरी येथील वेंगुर्लेकर कुटुंबीय आज सकाळी कुडाळ येथे देवदर्शनासाठी गेले होते. आज सायंकाळी हे सर्वजण घरी परतले. गाडीतील सर्व कुटुंबीय उतरून घरात गेले. त्यानंतर लावण्या हिच्या आईचे बूट गाडीत राहिल्याने ते आणण्यासाठी ती गाडीजवळ गेली. तिच्या मागोमाग लावण्या हीसुद्धा गेली. तिची आई गाडीतून बूट काढत असताना लावण्या ही पुढील चाकाजवळ जाऊन बसली. मात्र, याची पुसटशी कल्पना तिच्या आईस व चालकास नव्हती.

आईने बूट काढून दरवाजा बंद केला. यावर गाडीत कोणी नाही म्हणून चालकाने गाडी सुरू केली. यात डोक्‍यावरून गाडीचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना लक्षात येताच वेंगुर्लेकर कुटुंबीयांनी आक्रोश केला. तिला तत्काळ शहरातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. रात्री तिचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी नेण्यात आला.

रुग्णालय परिसरात वायरीसह शहरातील नागरिकांनी गर्दी केली होती. वेंगुर्लेकर कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेमुळे शहर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसही ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com