तुटवड्यामुळे नारळाचे दर कडाडले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

सावंतवाडी - ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर तुटवडा जाणवत असल्यामुळे नारळांनी पंचविशी गाठली आहे. मागणी मोठी आणि नारळ मिळतच नसल्यामुळे ही परिस्थिती आहे, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

कोकणात मोठ्या प्रमाणात आहारात नारळाचा वापर केला जातो. त्याच बरोबर सणासुदीत धार्मिक कामे तसेच आहारासाठी नारळाला मोठी मागणी असते. नवरात्रीच्या काळात नारळाचे दर गगनाला भिडलेले होते. या परिस्थितीतही नारळाची खरेदी झाली. ऐरव्ही दहा ते पंधरा रुपयाला विकले जाणारे नारळ आता वीस ते पंचवीस रुपयाला विकले जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मात्र आता खोबरे पुरून वापरावे लागत आहे.

विक्रेत्यांकडूनसुद्धा दरात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. नेहमीच्या तुलनेत नारळ उपलब्ध होत नाहीत, तसेच माकडे आणि मोबाईल टॉवरच्या परिणामामुळे नारळाचे उत्पादन घटल्याचे काही विक्रेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशीच परिस्थिती राहिल्यास नारळाचा दर तीस रुपयांच्यावर जाण्याची शक्‍यता आहे. याबाबत आरोंदा येथील नारळ व्यापारी श्री. परब यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘सद्यस्थिती लक्षात घेता नारळाची आवकच घटली आहे. त्यामुळे काही झाले तरी नारळ उपलब्ध होत नाहीत.

दुसरीकडे बांदा दोडामार्ग भागात नारळ मोठ्या प्रमाणात मिळत होते; मात्र माकड आणि मायनिंग प्रकल्पामुळे नारळ उत्पादन कमालीचे घटले आहे. त्यामुळे लोकांना आता महागाईला सामोरे जावे लागत आहे.’’

केरळची आवक घटली
जिल्ह्यात पावसाच्या अनियमिततेमुळे यंदा नारळाचे पीक कमी प्रमाणात आहे. विविध रोग यांचाही त्यावर प्रादुर्भाव दिसत आहे. यासोबतच केरळमध्ये प्रक्रीया उद्योग वाढले आहे. त्यामुळे केरळहून होणारी नारळाची आवकही बंद झाली आहे. परिणामी स्थानिक व्यापाऱ्यांना लोकल मार्केटवरच अवलंबून राहावे लागत आहेत.

Web Title: sindhudurg news coconut rate rise