सिंधुदुर्गातील कुडासेत सापडले मृत माकड 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

कोलझर - कुडासे भरपालवाडी येथे मृत स्थितीतील माकड आढळल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत संबंधीत अधिकाऱ्यांना कळवूनही ते फिरकले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांनीच माकडाच्या मृतदेहाचे दहन केले. 

कोलझर - कुडासे भरपालवाडी येथे मृत स्थितीतील माकड आढळल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत संबंधीत अधिकाऱ्यांना कळवूनही ते फिरकले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांनीच माकडाच्या मृतदेहाचे दहन केले. 

परिसरात माकडतापाची चाहूल लागली आहे. आडाळी भागात केएफडी पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. या पाठोपाठ माकड मृत होण्याच्या घटनाही घडू लागल्या आहेत. गेल्या आठवड्यात येथील कोळंबवाडीत मृत स्थितीतील माकड सापडला होता. काल कुडासे भरपालवाडी येते पुन्हा असा मृत माकड सापडला. हा प्रकार लक्षात येताच ग्रामस्थांनी आरोग्य व वनविभागाच्या संबंधितांना कळविले; मात्र ते या भागाकडे फिरकले नाहीत. यापासून रोग पसरु नये म्हणून ग्रामस्थांनी एकत्र येत मृतदेह जाळून नष्ट केला. काजू हंगामाच्या चाहूल लागली आहे. गेल्यावर्षी याच हंगामात माकडतापाने डोके वर काढले होते. यामुळे ग्रामस्थ काजू गोळा करायलाही जातांना घाबरत होते. पुन्हा असा प्रकार घडण्याच्या शक्‍यतेने भीतीचे सावट पसरले आहे. आरोग्य विभागाने यावर तातडीने प्रतिबंधक उपाय योजावेत अशी मागणी होत आहे. 
 

Web Title: Sindhudurg News Dead Monkey found in Kudase