कवीचे गाव वेंगुर्ले संकल्पनेसाठी ३० लाख देणार - दीपक केसरकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

कुडाळ - वेंगुर्ले येथे कविचे गाव ही संकल्पना उभी करण्यासाठी जिल्हा नियोजनातून ३० लाखाचा निधी दिला जाईल. साहित्याची जपणूक कोकणातच होते, असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कोकण मराठी साहित्यपरिषदेच्या राज्य स्नेहमेळावा व पूरस्कार वितरण सोहळ्यात केले.

कुडाळ - वेंगुर्ले येथे कविचे गाव ही संकल्पना उभी करण्यासाठी जिल्हा नियोजनातून ३० लाखाचा निधी दिला जाईल. साहित्याची जपणूक कोकणातच होते, असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कोकण मराठी साहित्यपरिषदेच्या राज्य स्नेहमेळावा व पूरस्कार वितरण सोहळ्यात केले. राज्यातील विविध नामवंत साहित्यिकांनी विविध पूरस्कारांनी गौरविण्यात आले. कोमसापचा आदर्श शाखा पूरस्कार कुडाळ शाखेला मिळाला.

कोकण मराठी साहित्य परिषदेचा राज्यस्तरीय स्नेहमेळावा प्रथमच कोकणात कुडाळ येथील कुडाळ हायस्कूलच्या सभागृहात पालकमंत्री केसरकर कोमसापचे संस्थापक पद्‌मश्री मधुमंगेश कर्णिक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या वेळी केंद्रीय अध्यक्ष महेश केसरकर, विश्‍वस्त नमिता किर, रमेश किर, आर. एम. पाटील, अरुण नेरुरकर, कोमसाप जिल्हाअध्यक्ष मंगेश मस्के व्यासपीठावर होते. 

केसरकर म्हणाले, ‘‘अनेक साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून कोकणला जगाच्या नकाशावर नेले. येथील शेतकरी आपल्या जमिनी देत नाही कारण त्याचे झाडांवर आंबा बागायतीवर प्रेम असते. हे प्रेमच पर्यटनाला चालना देणारे असते. मधुभाईच्या साहित्यांनी कोकणची जपणूक केली. भविष्यात साहित्यिकांचे मूलभूत प्रश्‍न सोडविण्यासाठी मी काम करणार आहे. अनेक प्रतिभावंतानी आपल्या करिअरची सुरूवात वेंगुर्ले येथून केली. म्हणूनच कवितांचे गाव ही संकल्पना वेंगुर्ले येथे साकारणार आहे.’’

पद्‌मश्री मधु कर्णिक यांनीसुध्दा उपस्थित साहित्यप्रेमींना मार्गदर्शन केले. कोमसापच्यावतीने साहित्यिकांनी कादंबरी, कथासंग्रह, कविता चरित्र आत्मचरित्र, ललितगद्य, बालवाङमय, सकीर्ण वैचारिक नाटक, एकांकिका, कला सिनेमा या साहित्य प्रकारांना पूरस्कार दिले जातात. प्रथम क्रमांकाच्या पुरस्काचे स्वरूप रु. ५०००, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, विशेष पूरस्काराचे स्वरूप रु. ३००० सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह असे आहे. २०१७ चे विशेष पूरस्कार आज राज्यभरातील साहित्यिकांना देण्यात आले. 

या वेळी संजय पडते, आनंद वैद्य, द. नाप्रभू, उषा परब, वृदा कांबळी, ना. बा. रणसिंग, भरत गावडे, विठ्‌ठल कदम, अरुण मर्गज, संतोष वालावलकर, डॉ. दिपाली काडरिकर, जयवंती सावंत, जयंती कुलकर्णी, मंगल परुळेकर, विजय भोगटे, रा. बा. खानोलकर, जान्हवी पडते, रवी गावडे, अजय सावंत, विजय पालकर, विलास कुडाळकर, उपस्थित होते.

पुरस्कार विजेते असे - 
राजश्री बर्वे, कल्पना बांदेकर, वसुंधरा तारकर, नरसिंग इंगळे, जगन्नाथ वर्तक, भावना पाटोळे, भावना पाटोळे, डॉ. विद्याधर करंदीकर, वैभव साटम, प्रतिभा सराफ, मानसी हजेरी, डॉ. अविनाश पाटील, विनोद पिवळे, डॉ. सोमनाथ डी. कदम, अमोल रेडीज यांच्या विविध कादंबरी, कथा संग्रह व पुस्तकांना पूरस्कार देण्यात आले. 

शिवाजी गावडे (मुंबई), साधना ठाकूर (शाखा कुडाळ), नमिता कीर लक्षवेधी पूरस्कार कल्पना मलये, सौरभ नाईक, आजीव पाटील, सुरेश खटावकर, पुंडलीक म्हात्रे यांना देण्यात आला.

महाराष्ट्र स्तरावरील कवीला देण्यात येणारा सन्मानाचा पूरस्कार द. बा. धामणसकर यांना देण्यात आला. कवी उमाकांत कीर स्मृती काव्य पूरस्कार गुरुनाथ तेंडुलकर, को. म. सा. प. युवा कार्यकर्ता पूरस्कार निखील मोंडकर (ठाणे) यांना देण्यात आला.

Web Title: Sindhudurg News Deepak kesarkar comment