राणेंविरोधात मनी लाँडरिंगचे प्रकरण ः केसरकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

सावंतवाडी - नारायण राणे यांच्याविरोधात मनी लाँडरिंगचे प्रकरण दाखल असल्यामुळेच त्यांनी पक्ष बदलला, असा आरोप गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी येथे केला. राणेंची पार्श्‍वभूमी सर्वांनाच माहीत आहे. ते माहीत असूनही सत्ताधारी त्यांना मंत्रिपद देत असतील तर ते चुकीचे आहे, असेही ते पत्रकार परिषदेत म्हणाले.

श्री. राणे यांनी केलेल्या आरोपांना त्यांनी उत्तर दिले. श्री. केसरकर म्हणाले, ‘‘आपण स्मलिंगच्या घरातून आहोत, असा कोणताही पुरावा नाही. यापूर्वी मी राणे यांना त्या संदर्भात आव्हान दिले होते, मात्र त्यांनी कोणतेही पुरावे दिले नाहीत. उलट राणेंवर या आधी गंभीर गुन्ह्यांचे आरोप होते. त्यांच्यावर खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल होते. खंडणी प्रकरणही मध्यंतरी गाजले. मी गृह राज्यमंत्री असल्यामुळे त्यांच्या सगळ्याच कुंडल्या माझ्याकडे आहेत. राणेंची बडबड ही आचारसंहिता संपेपर्यंत असणार आहे. निवडणूक निकालानंतर सर्व काही चित्र स्पष्ट होईल. राणेंनी अनेक वर्ष मंत्रिपद भोगले, मात्र जिल्ह्याच्या विकासासाठी ते काहीही करू शकले नाहीत. एक वैद्यकीय कॉलेज आणले; पण तेही खासगी आहे. सर्वसामान्यांना परवडणारे नाही; मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, यासाठी मी मात्र पाहणी केली. तसे प्रयत्नही सुरू आहेत.’’

ते म्हणाले, ‘‘महामार्ग खड्डेमय आहेत, त्याला केसरकर जबाबदार आहेत, असा आरोप करणाऱ्या राणे यांच्याच काळात महामार्गाचे काम झाले. त्यातील टक्केवारीचे पैसे त्यांच्याच घशात गेले. या मागे त्यांचेच कंत्राटदार होते. तोंड वर करून बोलणे चुकीचे आहे. आपण गृह राज्यमंत्री असल्यामुळे राणेंचे अनेक कारनामे मला माहिती आहेत. या सर्व प्रकरणात अडचणीत येऊ नये म्हणूनच राणेंनी पक्ष बदलाचा निर्णय घेतला आहे.’’

Web Title: Sindhudurg News Deepak Kesarkar Press