पिंगुळीत झिंगलेल्या पोलिसाचा अवतार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

कुडाळ - पिंगुळी येथे एका पोलिस कर्मचाऱ्यालाच दारू पिऊन झिंगलेल्या स्थितीत पकडण्यात आले. त्याच्या गाडीत दारूचा साठा होता, अशी चर्चा होती. मात्र येथील पोलिसांनी दारूसाठा मिळाल्याचा इन्कार करत त्याची खातेनिहाय चौकशी होणार असल्याचे स्पष्ट केले. 

गोवा बनावटीच्या दारूच्या बेकायदा वाहतुकीच्या विषयावरून जिल्ह्यातील काही पोलिस याआधी चर्चेचा विषय ठरले आहेत. विशेषतः गोव्याच्या सीमेवरील बांदा पोलिस ठाणे याबाबत नेहमीच चर्चेत असते. आज पकडलेला पोलिसही त्याच पोलिस ठाण्यात कार्यरत असल्याचे समजते.

पिंगुळी, वायंगणी पूल येथे आज सायंकाळी ग्रामस्थांना एक मारुती झेन गाडी रस्त्याच्या कडेला कलंडलेली दिसली. त्यांनी आत डोकावून पाहिले असता चालकाच्या सीटवर पोलिसाचा गणवेश घातलेली व्यक्ती होती. शिवाय गाडीत दारूचे खोके असल्याची चर्चा ग्रामस्थांत होती. संबंधित पोलिस दारू पिल्याने शुद्धीवर नव्हता. स्थानिकांनी याची कल्पना कुडाळ पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. गाडीची तपासणी केली असता आज दारू किंवा अन्य काही सापडले नसल्याचा दावा आहे. याबाबत पोलिस निरीक्षक अविनाश भोसले म्हणाले, संबंधित पोलिस नशेत होता. या प्रकाराची खातेनिहाय चौकशी केली जाणार आहे.

Web Title: Sindhudurg News drunk Police in Pinguli