दुरांतो एक्सप्रेस अपघाताची उच्चस्तरीय चौकशी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

सावंतवाडी -  येथून जवळच नेमळे-पाटकरवाडी येथे दुरांतो एक्स्प्रेसचे इंजिन घसरून झालेल्या अपघात प्रकरणी कोकण रेल्वेने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

सावंतवाडी -  येथून जवळच नेमळे-पाटकरवाडी येथे दुरांतो एक्स्प्रेसचे इंजिन घसरून झालेल्या अपघात प्रकरणी कोकण रेल्वेने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी दोघा सेक्शन अधिकार्‍यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. साडे आठ वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत होईल, अशी माहिती कोकण रेल्वेच्या वरिष्ठ सुत्रांनी दिली.

अपघात झाला त्या आधी संबंधित ट्रकवर दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे समजते. त्याचा आणि या अपघाताचा काही संबंध आहे का याची पडताळणीही केली जाणार आहे. सिनीअर अ‍ॅडमिनीस्टेटीव्ह ग्रेड दर्जाची चौकशी करण्याचे आदेश काढण्यात आले. मार्ग मोकळा करण्यासाठी घटनास्थळी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या गाडीला सिंधुदुर्गात थांबा नसतो. या गाडीचा वेगही जास्त असतो. सुदैवाने या अपघातात मोठी दुर्घटना टळली आहे.

Web Title: sindhudurg news Durato Express accident enquiry