वैभववाडीतील 22 शाळांमध्ये ई क्‍लास

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

वैभववाडी - मानव विकास कार्यक्रमांतर्गत तालुक्‍यातील 16 प्राथमिक आणि 6 माध्यमिक शाळांमध्ये बीएसएनएलच्या माध्यमातुन ऑनलाईन ई-क्‍लास उपक्रम राबविण्यात येणार आहे. संगणक व अनुषंगिक साहित्य खरेदीकरीता 29 लाख 36 हजार रूपयांचा निधी मंजुर असुन येत्या शैक्षणिक वर्षापासुन हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

वैभववाडी - मानव विकास कार्यक्रमांतर्गत तालुक्‍यातील 16 प्राथमिक आणि 6 माध्यमिक शाळांमध्ये बीएसएनएलच्या माध्यमातुन ऑनलाईन ई-क्‍लास उपक्रम राबविण्यात येणार आहे. संगणक व अनुषंगिक साहित्य खरेदीकरीता 29 लाख 36 हजार रूपयांचा निधी मंजुर असुन येत्या शैक्षणिक वर्षापासुन हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

मानव विकास कार्यक्रमांतर्गत शाळांमध्ये बीएसएनएल ऑनलाईन ई क्‍लास शैक्षणिक उपक्रम राबविण्यास मानव विकास आयुक्तालय औरंगाबादकडुन मान्यता मिळाली आहे. तालुक्‍यातील गांगेश्‍वर विद्यामंदीर भुईबावडा, विद्यामंदीर आचिर्णे मधलीवाडी, विद्यामंदीर आचिर्णे क्रमांक 1, विद्यामंदीर कुसुर क्रमांक 1, विद्यामंदीर कोकिसरे खांबलवाडी, विद्यामंदीर कोकिसरे नारकरवाडी, विद्यामंदीर नाधवडे बौध्दवाडी, विद्यामंदीर चारवाडी नाधवडे, दत्तविद्यामंदीर वैभववाडी, रामेश्‍वर विद्यामंदीर एडगाव क्रमांक 1, विद्यामंदीर कुसुर बाजारवाडी, सिताराम विद्यामंदीर उंबर्डे, केंद्रशाळा खांबाळे क्रमांक 1, केंद्रशाळा नाधवडे, उंबर्डे उर्दु, कोळपे मराठी क्रमांक 1 या प्राथमिक तर अरविंद सावंत सरदार माध्यमिक विद्यालय नाधवडे, माध्यमिक विद्यालय उंबर्डे, यशवंतराव चव्हाण विद्यालय आचिर्णे, आदर्श विद्यामंदीर भुईबावडा, माधवराव पवार विद्यालय कोकिसरे, अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी या माध्यमिक विद्यालयाचा समावेश आहे.

हा उपक्रम राबविण्यासाठी संगणक आणि आवश्‍यक साहित्य खरेदी करण्याची जबाबदारी शाळांवर सोपविण्यात आली आहे. त्याकरीता 29 लाख 36 हजार 291 रूपये मंजुर करण्यात आले आहेत. प्रत्येक शाळेच्या खात्यावर ही रक्कम विभागुन वितरीत करण्यात आली आहे.

इंटरनेट खर्चासाठी निधी वर्ग
बीएसएनएलच्या माध्यमातुन सर्व शाळांना ब्रॉडबॅंन्ड सेवा पुरविण्यात येणार आहे. यासाठीचा निधी शाळेच्या मुख्याध्यापकांनी भारत दुरसंचार विभागाकडे वर्ग केला आहे. संगणक किवा अनुषंगिक वस्तु खरेदी करताना पुरवठादारासोबत करार करावयाच्या सुचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत.

Web Title: Sindhudurg News E Class in 22 schools in Vaibhavwadi