वीजघरच्या रात्री दहशतीखाली

प्रभाकर धुरी
गुरुवार, 28 जून 2018

दोडामार्ग - हत्तींच्या दहशतीने सह्याद्रीच्या रांगामध्ये वसलेला वीजघर परिसर सध्या दहशतीखाली आहे. रोज रात्री लाखो रुपये मूल्याच्या केळी व इतर पीक हत्तीच्या पायदळी तुडवले जात आहे. यामुळे जिल्ह्याच्या उत्तरेकडील या भागाला कोणीच वाली नाही का ? अशा भावना इथल्या रहिवाशांच्या झाल्या आहेत.

जिल्ह्यात सध्या पाच हत्ती नुकसान करत आहेत. यांतील एक टस्कर तिलारी धरणाच्या बुडीत क्षेत्रातच मुक्काम ठोकून आहे. तो हेवाळे, बाबरवाडी गावांत धुमाकूळ घालतो. काही दिवसांपूर्वीच चंदगड तालुक्‍यातील वाघोत्रे गावातून एक हत्ती खाली उतरला. त्यापाठोपाठ आणखी तीन हत्तींचा कळप त्याला येऊन मिळाला. त्यांनी सध्या वीजघर, राणेवाडी, घाटीवडे, बांबर्डे या गावांमध्ये अक्षरक्षः उच्छाद मांडला आहे. या भागात व्यावसायिक पद्धतीने केळीचे उत्पादन घेतले जाते. हत्ती खातो कमी, पण नुकसान अपरिमित करतो. हा कळप एका रात्रीत लाखोंचे पीक पायदळी तुडवत आहे.

वीजघर राणेवाडी परिसरातील केळी बागेत घुसलेल्या हत्तींनी सोमवारी रात्री (ता. २५) चार शेतकऱ्यांचे ३ लाख २३ हजार ४०० रुपयांचे नुकसान केले. त्यांनी ५३९ घडाने लगडलेल्या उभ्या केळी काही क्षणांत भुईसपाट केल्या. आठवडाभरात केळीचे घड तोडून बाजारात विक्रीसाठी नेले जाणार होते. साधारणपणे एका घडाचे किमान सहाशे रुपये मिळणार होते; पण हत्तींनी होत्याचे नव्हते केले. एका रात्रीत तब्बल  ५३९ केळी मोडल्या गेल्याने सुमारे सव्वातीन लाख रुपयांचे नुकसान झाले.

Web Title: Sindhudurg News elephant in Dogamarg