हत्तीकडून दोडामार्ग तालुक्यातील हेवाळेत शेतीचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

दोडामार्ग - हेवाळे बाबरवाडीतील शेती बागायतीचे नुकसान हत्तीने केले. तेरवणमेढेत गावकऱ्यांनी सोडलेल्या तीन हत्तींच्या कळपाने बाबरवाडीकडे कूच केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ​

दोडामार्ग - हेवाळे बाबरवाडीतील शेती बागायतीचे नुकसान हत्तीने केले. तेरवणमेढेत गावकऱ्यांनी सोडलेल्या तीन हत्तींच्या कळपाने बाबरवाडीकडे कूच केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. 

तिलारी खोऱ्यात पाच हत्ती आहेत. सोनावल, पाळये परिसरातील तीन हत्तींना गावकऱ्यांनी तेरवण मेढे येथील उन्नेयी बंधाऱ्यात नेऊन सोडले होते. त्यातील दोन हत्ती मेढे परिसरात सकाळी सहाच्या दरम्यान रस्त्यालगत फिरत असताना संदेश जनार्दन गवस यांना दिसले. त्यानंतर ते मेढे धरणातून बाबरवाडीकडे गेले. तेथे त्यांनी केळी, पोफळीचे नुकसान केले. वनपाल दत्ताराम देसाई, वनरक्षक ग. वि. लोकरे यांनी नुकसानीचा पंचनामा केला. 

Web Title: Sindhudurg News Elephant seen in Hevale Babarwadi

टॅग्स