सावंतवाडी तालुक्यात वन्यप्राण्यांमुळे शेतकरी त्रस्त

कृष्णकांत साळगांवकर
बुधवार, 31 जानेवारी 2018

सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्यातील ग्रामीण भागात वन्य प्राण्यांनी धुमाकूळ घालून भातशेती, केळी व नारळ बागा यांची नासधूस केली असून शेतकरी वर्ग यामुळे हैराण झाला आहे. 

सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्यातील ग्रामीण भागात वन्य प्राण्यांनी धुमाकूळ घालून भातशेती, केळी व नारळ बागा यांची नासधूस केली असून शेतकरी वर्ग यामुळे हैराण झाला आहे.

सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली, कास, न्हावेली, मळगाव, माजगाव, शेर्ले तसेच इतर भागात उन्हाळी भातशेती मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र गवे रेडे या भातशेतीत रात्रीच्या वेळी फिरून नासधूस करतात. या बरोबरच वन्य प्राण्यांचेही पाळीव जनावरांवर हल्ले वाढवले आहेत.  त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. वनखात्यास याबाबत तक्रार करूनही यावर कोणत्याही प्रकारची उपाय योजना केली जात नाही. सोनुर्ली परिसरात बिबट्यांने पाळीव जनावरांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. दिवसाही वन्य प्राण्यांचा वावर दिसून येत आहे. त्यामुळे शेतात जाणे सुद्धा शेतकऱ्यांनी सोडले आहे. सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांना वाली कोण असा सवाल सोनुर्लीतील ग्रामस्थ करत आहेत. हंगामी भात शेतीची नासधूस सुरू आहे. एकंदरीत भात शेतीच धोक्यात आली आहे असेच चित्र आहे.

वाघ आणि गव्या रेड्यांच्या त्रासामुळे शेतकऱ्यांना शेती करणे कठीण झाले आहे.  उन्हाळ्यात भात शेतीचे मोठे नुकसान गव्यांकडून होते. वनखात्याला याबाबत तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नाही. वन्य प्राण्यांच्या भीतीने शेतीत फिरणेही धोक्याचे झाले आहे. 

- यशवंत उर्फ भाऊ गावकर, शेतकरी 

Web Title: Sindhudurg News Farmers suffer because of wildlife