सावंतवाडीत भरवस्तीत गांज्या पार्टीचा प्रकार उघडकीस

अमोल टेंबकर
बुधवार, 17 जानेवारी 2018

सावंतवाडी - येथील भरवस्तीत सुरू असलेली गांजा पार्टी शिवसेनेच्या नगरसेवक अनारोजीन लोबो यांच्यासह नागरिकांनी उधळली. काल रात्री साडे दहा वाजता जुनाबाजार चॅपल गल्ली परिसरात हा प्रकार उघड झाला.  या पार्टीत पाचहुन अधिक मुले- मुली सहभागी झाले होते.

यावर माहिती देताना लोबो म्हणाल्या, स्थानिकांनी या पार्टीबाबत आम्हाला माहिती दिली. तसे आम्ही पोलिसांनाही याची माहिती दिली. पण पोलिस तब्बल दीड तासाने घटनास्थळी पोहोचले. याआधी आम्ही तेथे जाऊन हा प्रकार थांबवला व या प्रकारातील सहभागी युवकांना चोप दिला. पोलिसांनी या प्रकरणी कडक भूमिका घेणे गरजेचे आहे.  पण पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. या प्रकाराबाबत नागरीकांना सतर्क राहून पोलिसांकडे तक्रार करण्याची गरज आहे.

या मुलांना गांजा आणि ड्रग्ज कोण पुरवते याची चाैकशी होण्याची गरज आहे. यावर पोलिसांनी कारवाई न केल्यास चार दिवसात उग्र आंदोलन करण्याचाही इशाला लोबो यांनी दिला.
यावेळी लोबो यांच्यासह उपनगराध्यक्ष अन्नपुर्णा कोरगावकर, नगरसेविक शुभांगी सुकी आदीही उपस्थित होते. 

Web Title: Sindhudurg News Ganja party in Sawantwadi