गाव विकासचे पदाधिकारी स्वाभिमानमध्ये

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

कणकवली - येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीत गाव विकास आघाडीच्या माध्यमातून राजकारणात आलेल्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार राकेश राणे यांच्यासह त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला. खासदार नारायण राणे यांनी सर्वांचे स्वागत केले.

आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत, नगराध्यक्ष समीर नलावडे उपस्थित होते. कणकवली नगरपंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर गावविकास आघाडी स्थापन झाली होती. या आघाडीने नगराध्यक्ष पदाबरोबरच आठ नगरसेवक पदासाठी उमेदवार उभे केले होते. त्यांना 
अपयश आलेे. 

नगराध्यक्षपदाचे उमेदवार राकेश राणे, मनोहर राणे, अंबाजी राणे, संजना सदडेकर, सखाराम राणे, श्रीकृष्ण राणे, मौसीन शेख, श्रीकृष्ण निकम, संतोष पिळणकर, मंगेश घाडीगावकर, उमेश बुचडे, गणेश राणे, दत्तात्रय सावंत, गुरू बाणे, सदानंद राणे, संदीप राणे, मंदार सावंत, मंगेश घाडीगावकर आदी तीस जणांनी स्वाभिमान पक्षात प्रवेश केला.

Web Title: Sindhudurg News Gav Vikas entered in Swabhiman