सिंधुदुर्गात जीआय टुरिझम सर्किट 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

सावंतवाडी - सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या पर्यटनाला जीआय (भौगोलीक मानांकन) टूरीझम सर्किटची झालर देण्याच्या दृष्टिने प्रयत्न सुरू झाले आहेत. याबाबतचा आराखडा बनवण्याच्या दृष्टिने कामही सुरू झाले आहे. दिल्लीत याबाबत नुकतीच उच्चस्तरीय बैठक होवून यात कोकणातील या दोन्ही जिल्ह्यांबरोबरच महाबळेश्‍वर, नाशिकमध्ये या दिशेने काम करण्याचा निर्णय झाला. 

सावंतवाडी - सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या पर्यटनाला जीआय (भौगोलीक मानांकन) टूरीझम सर्किटची झालर देण्याच्या दृष्टिने प्रयत्न सुरू झाले आहेत. याबाबतचा आराखडा बनवण्याच्या दृष्टिने कामही सुरू झाले आहे. दिल्लीत याबाबत नुकतीच उच्चस्तरीय बैठक होवून यात कोकणातील या दोन्ही जिल्ह्यांबरोबरच महाबळेश्‍वर, नाशिकमध्ये या दिशेने काम करण्याचा निर्णय झाला. 

कोकणात कृषी, मासेमारी क्षेत्राबरोबरच पर्यटन विकासासाठी गेली काही वर्ष प्रयत्न सुरू आहेत; मात्र याला अपेक्षित गती आलेली नाही. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा जाहीर करण्यात आला; मात्र किनारपट्‌टी वगळता इतर भागात पर्यटन विकास पोचू शकला नाही. केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी पर्यटनातील बॅकलॉक भरून काढण्यासाठी जीआय टूरीझम सर्किट या संकल्पनेत जिल्ह्याचा समावेश केला जातो.

याबाबत दिल्लीत वाणिज्य, हवाई वाहतूक, निर्यात, कृषी उत्पादने या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक झाली. यात सिंधुदुर्ग-रत्नागिरीसह महाबळेश्‍वर, नाशिक येथे जीआय टुरिझम सर्किट विकसीत करून तेथील स्थानिक कृषी उत्पादनांना सक्षम बाजारपेठ मिळवून देण्याचे ठरले. स्पाईस बोर्ड, रबर बोर्ड याशिवाय कृषी उत्पादनांच्या निर्यातीशी संबंधीत यंत्रणांनी यात विशेष लक्ष द्यावे. बचत गट शेतकरी गट यांना यात सामावून घ्यावे, अशा सूचना श्री. प्रभू यांनी दिल्या. 

चिपी विमानतळ प्राधान्याने पूर्ण करा 
जीआय उत्पादनांचा प्रत्येक विमानतळावर स्टॉल उभारण्याबाबत धोरण बनविण्याची सूचना श्री. प्रभू यांनी या बैठकित हवाई उड्‌डाण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना दिली. चिपी (जि. सिंधुदुर्ग) येथील विमानतळाचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचा आदेशही त्यांनी दिला. 

या आहेत संधी 
कोकणात हापूस, कोकम, स्थानिक काजू ही भौगोलीक चिन्हांकन स्पर्धेतील उत्पादने आहेत. यावर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग कोकणात आहेत. जीआय टुरीझम सर्किटचा प्रयोग यशस्वी झाल्यास या उत्पादनाला स्थानिक सक्षम बाजारपेठ उपलब्ध होईल. कोकणात मसाला पिकांचे उत्पादनेही अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यामुळे स्पाईस टुरिझमची जोडही याला दिली जावू शकते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sindhudurg News GI Tourism circuit