गोवा बनावटीची एक लाखाची दारू जप्त

तुषार सावंत
शुक्रवार, 4 मे 2018

कणकवली - गोवा राज्यातील स्वस्त दारू हीसिंधुदुर्गाततूनच कोकण,  पछ्चिम महाराष्ट्रात काही गुप्त मार्गनी वाहतूक केली जाते असे गुप्त मार्ग मोकळे आहेत कणकवलीत महामार्गावर गुरुवारी थरारक पाठलाग करून  8 लाख रुपयांची मोटार आणि गोवा बनावटीची 1 लाख ५ हजार ८१० रुपयांची दारू जप्त करण्यात आली 

डीएसपी दिक्षितकुमार गेडाम यांच्या विशेष पथकाने सापळा रचून अवैध दारू वाहतूक रोखली. रत्नागिरीच्या दिशेने गोवा बनावटीची बेकायदा दारू वाहतूक होणार असल्याची वाहतूक शाखेच्या विशेष पथकाला माहिती मिळाली होती, शहरातील  जानवली पुलावर सापळा  लावण्यात आला होता. 

महामार्गावर संशयित मोटारीने  (MH-०७ A B-६०१४) ने हुलकावणी देत नांदगावच्या दिशेने पळ काढला. पोलिसांनी एका खाजगी वाहनाने पाठलाग करून नांदगाव पुलानजीक  इर्टीगा कारसमोर खाजगी गाडी आडवी करून गोवा बनावटीची १ लाख ५ हजार ८१० रुपयांची दारू आणि  9 लाख रुपयांची मोटार जप्त केली. 

या प्रकरणी संशयित आरोपी धीरज सुरेश भिसे, जसराज नार्वेकर (दोघे रा.बांदा) यांना ताब्यात घेतले वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शाहनावज मुल्ला, पोलीस नाईक पांडुरंग पांढरे, डॉमनिक डिसुझा, चालक विष्णू सावळ, संतोष ढोके, विश्वजित परब यांनी कारवाई केली.  

Web Title: Sindhudurg News Goa made liqueur seized