‘गोमेकॉ’ निःशुल्कसाठी २८ ला गोव्यात चर्चा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

दोडामार्ग - सिंधुदुर्गातील रुग्णांना निःशुल्क सेवा पुरविण्याबाबत २८ ला गोव्यात चर्चा केली जाणार आहे. गोव्याचे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

दोडामार्ग - सिंधुदुर्गातील रुग्णांना निःशुल्क सेवा पुरविण्याबाबत २८ ला गोव्यात चर्चा केली जाणार आहे. गोव्याचे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

गोव्याचे उपमुख्यमंत्री तथा नागरी विकास मंत्री ॲड. फ्रान्सिस डिसोझा यांची आज भाजपच्या शिष्टमंडळाने गोव्यातील रुग्णालयांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कासंदर्भात भेट घेतली. या वेळी त्यांनी बंदरे व वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री चव्हाण यांनी आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांना लिहिलेले पत्र सादर करून चर्चाही केली.

उपमुख्यमंत्री डिसोझा यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपचारासाठी अमेरिकेत असल्याने त्यांच्याशी आणि राज्यातील संबंधित मंत्र्यांशी २६ तारखेपर्यंत बोलून २८ मार्चला भाजपाच्या शिष्टमंडळासह आपल्याशीही सकारात्मक चर्चा केली जाईल, असे पत्र आज राज्यमंत्री चव्हाण यांना शिष्टमंडळाच्या मार्फत दिले आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, प्रदेश सचिव राजन तेली, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, पंचायत समिती सदस्य लक्ष्मण नाईक, नगरसेवक चेतन चव्हाण, तालुका उपाध्यक्ष शंकर देसाई, चंदू मळीक, नाना देसाई आणि पदाधिकाऱ्यांनी गोव्याचे उपमुख्यमंत्री ॲड. डिसोझा यांची भेट घेतली.

राज्यमंत्री चव्हाण यांनी तालुक्‍यातील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन गोवा शासनाने पूर्ववत निःशुल्क सेवा सुरू करावी, यासाठी ठिय्या आंदोलन सुरू असल्याची माहिती दिल्याने, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रूग्णांचा खर्च गोवा शासनाला देण्याची घोषणा अधिवेशनादरम्यान विधिमंडळात केल्याने सिंधुदुर्गातील रुग्णांना गोमेकॉ रुग्णालयात उपचारासाठी आकारण्यात येणारे शुल्क आकारू नये, असे पत्र गोव्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांना लिहिले आहे. 

ते आज शिष्टमंडळाने सादर करून उपमुख्यमंत्री डिसोझा यांच्याशी चर्चा केली. त्या अनुषंगाने त्यांनी राज्यमंत्री डिसोझा यांच्याशी चर्चा केली. त्या अनुषंगाने त्यांनी राज्यमंत्री चव्हाण यांना पत्र दिले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सिंधुदुर्गातील भाजप जिल्हाध्यक्ष, आमदार यांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राकडून गोव्याला देऊ केलेल्या उपचार खर्चाच्या प्रतिपूर्तीबाबत चर्चा झाली; पण मुख्यमंत्री उपचारानिमित्त अमेरिकेत असल्याने यावर गोवा सरकारला त्यांच्याशी आणि सर्व संबंधितांशी चर्चा करावी लागेल. ती सोमवारपूर्वी (ता.२६) केली जाईल.

त्यानंतर बुधवारी चव्हाण आणि शिष्टमंडळाशी चर्चा केली जाईल. ती सकारात्मक असेल तोपर्यंत आरोग्य आणि शुल्काच्या प्रश्‍नावरून सुरू असलेले आंदोलन थांबवण्यात यावे आणि जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करावी. दरम्यान सायंकाळी तेली, जठार यांनी येथे येऊन आंदोलकांशीही चर्चा केली. गोवा बेटीचा तपशील सांगितला.

...तर राजीनामा
यावेळी जठार म्हणाले,‘‘सिंधुदुर्गातील रुग्णांसाठी बांबुळी गोवा येथील गोमेकॉ रुग्णालय निःशुल्कबाबत २८ ला निर्णय होणार आहे. याबाबत ठोस निर्णय न झाल्यास आपण भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहे असून येथील जनआक्रोश आंदोलनकर्त्यांसोबत राहणार आहे.’’

Web Title: Sindhudurg News Gomaco charges issue