कुडाळात उद्या शिवसेनेचा पदवीधर मेळावा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

कुडाळ - कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकी संदर्भात शिवसेना पक्षाचा जिल्हास्तरीय पदवीधर मेळावा ८ ला सकाळी ११ वाजता येथील महालक्ष्मी हॉल येथे होणार आहे. या वेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिरसाट म्हणाले, ‘‘कोकण पदवीधर मतदारसंघात या आधी निवडून गेलेल्या आमदारांनी पदवीधरांचे कित्येक प्रश्‍न अद्यापपर्यंत सोडवलेले नाहीत. यामुळे शिवसेना पक्षाने पदवीधरांचे प्रश्‍न सोडवून त्यांना न्याय देण्यासाठी ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली आहे. युवा मतदारांनी हे जाणून घेऊन पदवीधरांच्या हितासाठी शिवसेना उमेदवाराला निवडून देणे महत्त्वाचे आहे. याबाबतचे मार्गदर्शन करून आपली भूमिका आदित्य ठाकरे मेळाव्यात मांडणार आहेत.’’

खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, सूरज चव्हाण, पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, अमोल किर्तीकर, वरूण सरदेसाई, संपर्क जिल्हाप्रमुख अरुण दुधवडकर उपस्थित रहाणार आहेत. या वेळी पंकज शिरसाट, संदीप महाडेस्वर, भूषण सावंत, विक्रांत नेवगी, योगेश धुरी, कल्पेश करमलकर, प्रसाद बागायतकर, विश्‍वनाथ म्हापणकर उपस्थित होते.

Web Title: Sindhudurg News Gradute Melava in Kudal