प्रचाराला कार्यकर्ते शोधण्याची वेळ

भूषण आरोसकर
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

सावंतवाडी - जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावण चांगलेच तापणार असल्याचे दिसून येत आहे; मात्र अशात प्रचारासाठी पक्षश्रेष्ठींना कायकर्ते शोधण्याची वेळ आली आहे. भातशेतीचा तोंडावर असलेल्या हंगामामुळे बराच ग्रामस्थवर्ग भातशेतीच्या कामात मग्न असल्याचे चित्र आहे. अशात बऱ्याच ठिकाणी पैसे देवून प्रचारासाठी कायकर्ते उभे करण्याची वेळ आली आहे.

सावंतवाडी - जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावण चांगलेच तापणार असल्याचे दिसून येत आहे; मात्र अशात प्रचारासाठी पक्षश्रेष्ठींना कायकर्ते शोधण्याची वेळ आली आहे. भातशेतीचा तोंडावर असलेल्या हंगामामुळे बराच ग्रामस्थवर्ग भातशेतीच्या कामात मग्न असल्याचे चित्र आहे. अशात बऱ्याच ठिकाणी पैसे देवून प्रचारासाठी कायकर्ते उभे करण्याची वेळ आली आहे.

जिल्ह्यात बिनविरोध वगळता २९५ ग्रामपंचातीच्या सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत. अगदी तोंडावर येवून राहिलेल्या या निवडणुकासाठी प्रचाराचा धुराळा उडाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचा सर्वात महत्वचा केंद्रबिंदु म्हणजे गावे होय आणि या गावावर आपला झेंडा फडकविण्यासाठी इच्छुक आहेत. 

सर्वात महत्वाची भुमिका बजावत असलेल्या कार्यकर्त्यांची आठवण प्रचार कार्यक्रमासाठी येते. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत मिळालेले यशापयश येथे भरुन काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्यामुळे या निवडणुकांत कार्यकर्त्यांसह सर्वच पक्षश्रेष्ठी सर्वच बाजुने आपला जोर लावणार असल्याचे समजते. त्यामुळे आता कार्यकर्त्याना सोबत घेवून प्रचार करण्यावर मोठा जोर देण्याचे काम सुरु झाले आहे. असे असले तरी पुरेसा कार्यकर्ता प्रचारासाठी सापडत नसल्याचे काही ठिकाणी चित्र आहे.

भातशेतीचा हंगाम सुरु आहे. अशात हळव्या जातीच्या भातपिके अगदी कापणी होण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यात ८० टक्के भातपिक हे हळव्या जातीचे असल्यामुळे शेतकरीवर्गाला इतर कामासाठी पुरेशी फुरसतही नसल्याचे दिसून येत आहे. अशात अगदी गावागावात निवडणुकांचे राजकारण रंगायलाही सुरुवात झाली आहे. अशात पक्षाच्या कार्यकर्त्याना प्रत्येक गावात फिरविणे शक्‍य नसल्याचे सर्वच समजून गेले आहेत. पुरेसा कायकर्ता वर्ग प्रचारासाठी आणायचा कुठून असा सवालही काही उमेदवार तसेच पक्षश्रेष्ठीपुढे आहे. 

जिल्ह्यात फक्त ४६ सरपंच व ७८५ सदस्य बिनविरोध झाले आहेत. त्यामूळे बहुतांशी ग्रामपंचायतीत उमेदवार व सदस्य निवडणुक रिंगणात आहेत. निवडणुक पूर्व काळात सदस्य व सरपंच शोधण्याची वेळ पक्षश्रेष्ठीवर यायची मात्र भातशेतीचा ऐन निवडणुक काळात आलेला हंगामाचा विचार करता आता प्रचारासाठी कायकर्ते शोधण्याची वेळ आली आहे. भातशेतीच्या कामातून वेळ काढून पक्षश्रेष्ठीकडून विनविण्या व विनंत्या होत असल्याचेही दिसून येत आहे, तर प्रचारासाठी कार्यकर्त्यानी वेळात वेळ द्यावा यासाठी निरनिराळे आश्‍वासने व आमिषेही दिली जात आहेत.

Web Title: sindhudurg news Grampanchayat Election