सिंधुदुर्गात जिल्हा परिषदेकडे सदस्यांची पाठ

नंदकुमार आयरे
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यातील ३२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अवघे चार दिवस शिल्लक राहिल्याने जिल्ह्यात प्रचाराचे वारे जोरदार वाहू लागले आहे. प्रथमच सरपंचपद हे थेट निवडून द्यायचे असल्याने सर्वच राजकीय पुढाऱ्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. ही आगामी निवडणुकांसाठी रंगीत तालीम असल्याने जास्तीत जास्त सरपंच आपल्या पॅनेलचे निवडून यावेत यासाठी जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्यांनी जोर लावला आहे. यामुळे जिल्हा परिषदेकडे मात्र त्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील ३२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १६ ला मतदान होणार आहे. जाहीर प्रचाराची मुदत १४ ला सायंकाळी साडेपाच वाजता संपणार आहे. जाहीर प्रचारासाठी अवघे तीन दिवस शिल्लक राहिल्याने निवडणूक रिंगणातचील उमेदवारांसह राजकीय पुढाऱ्यांमध्ये प्रचाराच्या जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. एकूण ३२५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये सरपंच पदासाठी ४६ तर सदस्यपदासाठी ९२६ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. आता सरपंचपदासाठी ८३७ तर सदस्यपदांसाठी ३ हजार ५२५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

निवडून आलेल्या सदस्यांमधून राजकीय पक्षाच्या पाठबळावर सरपंचपद हे आतापर्यंत निवड केली जात होती; मात्र या वेळी प्रथमच सदस्यांच्या व्यतिरीक्त सरपंचपद हे थेट निवडून द्यायचे असल्याने यावेळच्या ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणूका अतिशय रंगतदार ठरणार आहेत. सर्वच राजकीय पुढाऱ्यांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली आहे.

जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समित्यामध्ये राणेसमर्थक काँग्रेसचा आतापर्यंत वरचष्मा राहिला आहे; मात्र आता राणे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केल्याने राणेसमर्थक गटाकडून समर्थ विकास पॅनलच्या माध्यमातून ही निवडणूक लढविली जात आहे. त्यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. अन्य पक्षांनाही आपले गावा-गावातील अस्तित्व सिद्ध करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षाकडून आगामी निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे. यामुळे सदस्यांनी सध्या प्रचारात आघाडी घेतल्याने जिल्हा परिषदेकडे पाठ फिरवली आहे.

अनपेक्षित चेहरे रिंगणात...
ग्रामपंचायत निवडणूक राजकीय पक्षाच्या निशाणीवर लढविण्यात येत नसली तरी गावागावांत विविध राजकीय पक्षांचे पाठबळ असलेली गाव पॅनेल या निवडणुकीत उतरली आहेत. ऑनलाईन अर्ज आणि क्‍लिस्ट प्रक्रियेमुळे अनेक उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याने या निवडणुकीत अधिकच रंग चढला आहे. प्रत्यक्षात सुरवातीपासून सरपंच आणि सदस्यपदासाठी चर्चेत असलेले काही चेहरे बाजूला फेकले गेले असून, चर्चेत नसलेले काही चेहरे अनपेक्षितपणे निवडणूक रिंगणात पुढे आले आहेत. यामुळे काही गावांत निवडणुकीचा उत्साह कमी झालेला दिसत आहे.

Web Title: sindhudurg news Grampanchayat Election