हिर्लोक-किनळोस ग्रा.पं.साठी दुरंगी लढत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

कडावल - हिर्लोक-किनळोस ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच पद इतर मागास वर्ग प्रवर्गासाठी राखीव आहे. या पदासाठी दोन उमेदवार रिंगणात आहेत, तर सदस्य पदांसाठी एकूण तीन प्रभागांमधील सहा जागांसाठी निवडणूक होणार असून एक जागा बिनविरोध झाली आहे.

कडावल - हिर्लोक-किनळोस ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच पद इतर मागास वर्ग प्रवर्गासाठी राखीव आहे. या पदासाठी दोन उमेदवार रिंगणात आहेत, तर सदस्य पदांसाठी एकूण तीन प्रभागांमधील सहा जागांसाठी निवडणूक होणार असून एक जागा बिनविरोध झाली आहे.

हिर्लोक - किनळोस ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये पूर्वी तीन प्रभागामध्ये एकूण नऊ सदस्य पदे होती. नवीन प्रभाग रचनेत वॉर्ड क्रमांक २ व ३ मध्ये प्रत्येकी एक जागा कमी झाल्याने ग्रामपंचायतीची एकूण सदस्य संख्या आता सात झाली आहे. यापैकी वॉर्ड क्रमांक ३ मधील एक जागा बिनविरोध झाली असून उर्वरित सहा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात आहेत. सरपंचपद प्रथमच इतर मागास प्रर्वगासाठी राखीव झाले असून या पदासाठी कन्याश्री बाळकृष्ण मेस्त्री व ज्योती रमाकांत मेस्त्री यांच्यात अटीतटीची लढत होणार आहे. 

प्रभाग क्रमांक १ मध्ये खुल्या प्रवर्गातून दोन जागांसाठी रूक्‍मिणी शेळके, प्रमिला परब, सिता सावंत, अस्मिता सावंत इत्यादी उमेदवार रिंगणात आहेत. तर नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरूष प्रवर्गातून गजानन मेस्त्री व तानाजी चव्हाण यांच्यात लढत होणार आहे.

प्रभाग क्रमांक २ मधील एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री प्रवर्गासाठी राखीव असून येथे शारदा मेस्त्री व प्रतीक्षा कालेकर यांच्यात लढत होणार आहे. तर दुसरी जागा खुल्या प्रवर्गासाठी असून येथे नरेंद्र राणे व साबाजी परब हे रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक ३ मधील दोन जागांपैकी एक जागा अनुसूचीत जातींसाठी राखीव असून येथे मंगेश जाधव व मोहन कदम यांच्यात निवडणूक होणार आहे. तर दुसऱ्या जागेसाठी सोनाली सावंत यांची बिनविरोध निवड झाली आहे.

प्रचाराला जोर चढला आहे. प्रभागातील मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यावर उमेदवार भर देत आहेत. एकंदरीत सर्व काही आलबेल दिसत असले तरी खरे चित्र १६ ला स्पष्ट होणार आहे.

 

Web Title: sindhudurg news Grampanchayat Election