सावंतवाडी तालुक्‍यातील चौदा गावांच्या पोटनिवडणुका २६ ला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

सावंतवाडी -  तालुक्‍यातील चौदा गावांच्या पोटनिवडणुका २६ ला होणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात पाडलोस गावातून सरपंचपदासाठी एकच अर्ज आल्यामुळे त्याठिकाणी अनुसूचित जातीच्या अक्षरा लिंगाजी पाडलोसकर या बिनविरोध निवडून आल्या आहेत. अन्य चार गावातील सदस्य तुर्तास बिनविरोध झाले आहेत; मात्र छाननी प्रक्रियेनंतर चित्र स्पष्ट होणार आहे.

सावंतवाडी -  तालुक्‍यातील चौदा गावांच्या पोटनिवडणुका २६ ला होणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात पाडलोस गावातून सरपंचपदासाठी एकच अर्ज आल्यामुळे त्याठिकाणी अनुसूचित जातीच्या अक्षरा लिंगाजी पाडलोसकर या बिनविरोध निवडून आल्या आहेत. अन्य चार गावातील सदस्य तुर्तास बिनविरोध झाले आहेत; मात्र छाननी प्रक्रियेनंतर चित्र स्पष्ट होणार आहे.

चौदा पैकी सहा ग्रामपंचायतीमध्ये कोणीही अर्ज भरलेले नाहीत. त्यामुळे त्या जागा रिक्तच राहणार आहेत. तीन ग्रामपंचायती पाच जागांसाठी एकुण नऊ अर्ज आले आहेत. त्याची छाननी प्रक्रिया २६ ला होणार आहे. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी मतदान होवून तिसऱ्या दिवशी निकाल हाती येणार आहेत.

तालुक्‍यातील एकुण चौदा ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका लागल्या आहेत. यात गेळे, कोनशी, शिरशिंगे तांबुळी, सरमळे, माडखोल या सहा गावासाठी कोणीही अर्ज सादर केलेले नाहीत तर दुसरीकडे नाणोस मधून सर्वसाधारण जागेसाठी कीशोरी गोडकर, न्हावेली मधून नागरीकांचा मागास प्रवर्ग या जागेसाठी बबिता आरोंदेकर, निरवडे येथे मागास प्रवर्गाच्या जागेसाठी शिल्पा सावळ तर रोणापाल मधील मागास प्रवर्गाच्या जागेसाठी दिप्ती उपरकर यांचा अर्ज दाखल केला आहे.

मळेवाड येथील नागरीकांचा मागास प्रवर्ग या जागेसाठी स्वाती सातार्डेकर यांचा अर्ज आला आहे. त्याठिकाणी अन्य कोणाचेही अर्ज न आल्यामुळे तुर्तास त्यांची निवड ही बिनविरोधच ठरली आहे.

तळवडे ग्रामपंचायतीच्या प्रभाग एक मधील सर्वसाधारण जागेसाठी विवेकानंद तळवणेकर, विलास कोंडये, संजय जाधव असे तीन उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. प्रभाग क्रमांक २ मधील सर्वसाधारण स्त्री या जागेसाठी कीशोरी कुंभार, स्नेहा कुंभार आणि संजना रेडकर या तिघांनी अर्ज सादर केले आहेत. इन्सुल मधील प्रभाग क्रमांक १ मधील सर्वसाधारण अर्पिता राणे आणि सायली राणे या दोघांचा अर्ज आला आहे.

सर्व अर्जाची छाननी प्रक्रिया २६ ला तहसिल कार्यालयात होणार आहे. २७ ला निवडणुक आणि २८ ला मतमोजणी होणार आहे. ज्या गावातील सदस्य पदाचे अर्ज सादर झालेले नाहीत त्याठिकाणचा कार्यक्रम पुन्हा लावण्यात येणार आहेत, अशी माहिती तहसिलदार कार्यालयाचे निवडणूकीची जबाबदारी असणारे शरद मोरे यांनी दिली.

Web Title: sindhudurg news Grampanchayat Election