आचरा सरपंचपदासाठी दुरंगी लढत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

आचरा - आचरा ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी भाजप-शिवसेनेमध्ये युती झाल्याने सरपंचपदाची लढत दुरंगी होणार आहे. १३ सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांनी उमेदवारी कायम ठेवल्यामुळे काही प्रभागांमध्ये तिरंगी लढत होणार आहे. 

आचरा - आचरा ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी भाजप-शिवसेनेमध्ये युती झाल्याने सरपंचपदाची लढत दुरंगी होणार आहे. १३ सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांनी उमेदवारी कायम ठेवल्यामुळे काही प्रभागांमध्ये तिरंगी लढत होणार आहे. 

भाजप पुरस्कृत पॅनलचे सरपंचपदाचे उमेदवार युगंधरा मोर्जे यांनी अर्ज मागे घेतल्याने आता आचरा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी स्वाभिमान पक्ष पुरस्कृत आचरा गाव पॅनलच्या प्रणया टेमकर व शिवसेना पुरस्कृत पॅनलच्या ललिता पांगे यांच्यात थेट दुरंगी लढत होणार आहे. सदस्यपदाच्या १३ जागांसाठी ३५ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.

सरपंचपदाच्या निवडीसाठी शिवसेना-भाजप पक्षात युती झाल्यामुळे स्वाभिमान पुरस्कृत गाव पॅनल व शिवसेना-भाजप युतीचे पॅनल यांच्यात लढत होणार आहे. प्रभाग क्रमांक १ मध्ये सदस्यपदासाठी शिवसेना, भाजप व स्वाभिमान पक्षाच्या पॅनलमध्ये तिरंगी लढत होणार असल्याने आचरा ग्रामपंचायत निवडणूक सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. 

आचरा ग्रामपंचायत निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुकांनी भाऊगर्दी करत सरपंचपदासाठी ४ तर १३ सदस्यपदाच्या जागांसाठी ३८ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. १४ ला अर्ज छाननीत सर्वच अर्ज वैध ठरल्याने उमेदवारीबाबत उत्सुकता कायम राहिली होती.

आज शिवसेना पुरस्कृत डमी उमेदवार करिष्मा सक्रू व भाजप पक्ष पुरस्कृत उमेदवार युगंधरा मोर्जे यांनी आपला सरपंचपदाचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. साल्वादार मिरांडा, प्रीती पेडणेकर, चंद्रशेखर कामतेकर यांनी सदस्यपदासाठीचे उमेदवारी अर्ज मागे घेतले. सरपंचपदासाठी २ तर १३ सदस्यपदासाठी स्वाभिमान पक्ष पुरस्कृत पॅनलमधून १३, शिवसेना पक्ष पुरस्कृत ११, भाजप पुरस्कृत ५ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. २ पॅनलविरहित अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग ५ मध्ये भाजपचे २ उमेदवार सर्वसाधारण आरक्षणात उतरवल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.

आचरा ग्रामपंचायत १३ सदस्यपदासाठी ५ प्रभागांतून पुढीलप्रमाणे उमेदवारांची उमेदवारी निश्‍चित झाली आहे. प्रभाग क्रमांक १ हिर्लेवाडी शंकरवाडी प्रभागातून २ जागांसाठी सर्वसाधारण आरक्षणातून पांडुरंग वायंगणकर, किशोर कांबळी, समीर बावकर, सर्वसाधारण महिला आरक्षणासाठी रेश्‍मा कांबळी, कीर्ती पेडणेकर, शिवानी मुणगेकर रिंगणात उतरले आहेत. प्रभाग क्रमांक दोन पिरावाडी जामडूल प्रभागातून २ जागांसाठी ना. मा. प्रर्वगातून मुजफ्फर मुजावर, सतीश तळवडकर, प्रमोद कोळंबकर, सर्वसाधारण महिला आरक्षणासाठी संचिता आचरेकर, दिव्या आचरेकर, कांचन करंजे, गौरी सारंग रिंगणात उतरले आहेत. प्रभाग क्रमांक ३ गाउडवाडी, डोंगरेवाडी, काझीवाडामधील ३ जागांसाठी सर्वसाधारण आरक्षणासाठी जुबेर काझी, रवींद्र बागवे, सुनील सावंत, राजेश पडवळ, ना. मा. प्रवर्गासाठी योगेश गावकर, मंगेश मेस्त्री, सर्वसाधारण महिला आरक्षणासाठी नीता पांगे, अनुष्का गावकर रिंगणात आहेत.

प्रभाग क्रमांक ४ पारवाडी देऊळवाडीसाठीच्या ३ जागांसाठी सर्वसाधारण आरक्षणातून सचिन परब, रूपेश साटम, लवू घाडी, ना. मागास प्रवर्ग महिलासाठी करिष्मा सक्रू, श्रद्धा नलावडे, तर सर्वसाधारण महिला आरक्षणासाठी रिया घाडी, वैशाली कदम रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक ५ वरचीवाडी, भंडारवाडी मधील ३ जागांसाठी सर्वसाधारण आरक्षणातून मंगेश टेमकर, सुनील खरात, चंद्रशेखर भोसले, सर्वसाधारण महिला आरक्षणातून कांचन करंजे, ममता मिराशी, तर ना. मागास प्रवर्गमधून वृषाली आचरेकर, युगंधरा मोर्जे रिंगणात उतरल्या आहेत.

 

Web Title: sindhudurg news Grampanchayat Election