हापूस अजूनही आवाक्‍याबाहेरच...

भूषण आरोसकर
बुधवार, 18 एप्रिल 2018

सावंतवाडी - प्रतिकूल वातावरणाच्या गर्तेतून गेलेल्या हापूसचे बाजारात सध्या दर वधारलेलेच आहेत. हापूस डझन मागे ५०० ते ६०० रुपयांनी विकला जात आहे. तर दोन डझनची हापूस पेटी १००० ते १२०० पर्यंत उपलब्ध झाली आहे. गेल्या दोन दिवसांत डझनामागे १०० रुपये वाढल्याचे चित्र आहे.

सावंतवाडी - प्रतिकूल वातावरणाच्या गर्तेतून गेलेल्या हापूसचे बाजारात सध्या दर वधारलेलेच आहेत. हापूस डझन मागे ५०० ते ६०० रुपयांनी विकला जात आहे. तर दोन डझनची हापूस पेटी १००० ते १२०० पर्यंत उपलब्ध झाली आहे. गेल्या दोन दिवसांत डझनामागे १०० रुपये वाढल्याचे चित्र आहे.

यंदा हापूसला अवकाळी पावसाचा वेळोवेळी फटका बसला. थंडीही उशिराने सुरू झाली. सद्यस्थितीत हापूस पुरेशा प्रमाणात दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. येथील बाजारात स्थानिक विक्रेत्यांनी विक्रीस आंबा उपलब्ध करुन देण्यास सुरवात केली आहे. सुरवात ज्या प्रमाणात आंबा विक्रीस होत होता, त्यापेक्षा वेगळेच चित्र दिसून येत आहे. 

दर चढे राहण्याची शक्‍यता...
यंदा उत्पादन कमी असल्यामुळे याचा थेट परिणाम बाजारपेठेत दिसून येण्यास सुरुवात झाली आहे. येत्या काळातही तोच परिणाम राहणार असून हापूसच्या दराचा विचार करता वधारलेल्या हापूसच्या दरांना १५ ते २० मे नंतर अवकळा यायला सुरुवात होण्याची दाट शक्‍यता विक्रेत्यांकडून व्यक्त होत आहे.

आंब्याची आवक कमी झाल्यामुळे आंब्याचे दर चांगलेच वधारलेले दिसून येत आहे. हा एक महिन्यापूर्वीच आंबा बाजारात दाखल झाला आहे; मात्र हा कालावधी चांगल्यापैकी खरेदीसाठी असतो. असे असले तरी महाग दराने हापूस खरेदी करण्याची नामुष्की ग्राहकांवर आली आहे. सुरवातीला बाजारपेठेत आंबा दाखल झाल्यानंतर ४०० रुपये डझन आंबा होता. स्थानिक बाजारपेठेत आंब्याची खरेदी चांगल्या प्रकारे होवू लागली. 

यंदा हापूसची बऱ्यापैकी आवक घटली आहे. गेल्या दोन दिवसांपासून बाजारपेठेत दरही वधारलेले आहेत. कमी उत्पादनाचा थेट परिणाम दिसून यायला लागला आहे. येथील बाजारपेठेत येणाऱ्या स्थानिक विक्रेत्यांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे.
- अमित मठकर,
हापूस विक्रेता

आंब्याचे उत्पादनही कमी प्रमाणात झाल्यामुळे तसेच धीम्या गतीने आंबा बाजारपेठेकडे सरकू लागल्यामुळे पहिल्या टप्प्यातील आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक बाजारपेठेत झाली नाही. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून ४०० रुपयांचा दर आता ५०० ते ६०० रुपये डझनवर पोहोचला आहे. बाजारात दाखल झालेल्या आंब्याच्या प्रकारचा दर अशा प्रकारे आहे. पायरी आंबा ४०० ते ५०० रुपये डझन, हापूस आंबा ५०० ते ६०० रुपये डझन, गोवा माणकूर ६०० ते ७०० रुपये डझन, या काळातील हा दर मोठा असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. 

दोन डझन हापूसच्या पेटीचे दर ही त्याचनुसार वधारले आहेत. हापूसची पेटी १००० ते १२०० रुपयांपर्यंत देण्यात येत आहे. दीड महिन्यापूर्वी जिल्ह्यातून मुंबई बाजारपेठेत १  हजार रुपयाने हापूसच्या कैऱ्याची पेटी निर्यातही करण्यात आली आहे. हापूसची पेटी १ हजारच्या पुढे उपलब्ध झाली आहे.

Web Title: Sindhudurg News Hapus rate issue