कुडाळातही आरोग्याचा जनआक्रोश 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

कुडाळ - सिंधुदुर्गातील रुग्णांना गोवा येथे मोफत वैद्यकीय सेवा मिळावी या मागणीसाठी दोडामार्गने पुकारलेल्या जनआक्रोश आंदोलनाला आज कुडाळातील सर्वपक्षीयांनी पाठींबा देत धरणे आंदोलन केले. तत्काळ निर्णय न घेतल्यास महाराष्ट्रातून जीवनावश्‍यक वस्तू गोव्याला न पाठविण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला. पुढील बैठक 30 मार्चला असणार आहे. 

गोवा सरकारने सिंधुदुर्गातील रुग्णांना मोफत सेवा न देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या पार्श्‍वभूमीवर दोडामार्ग तालुक्‍यात गेले आठ दिवस जनआक्रोश आंदोलन सुरु आहे. आज कुडाळ तालुक्‍यातील नागरिकांनी प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत जाहीर पाठिंबा दिला. समाजसेवक अण्णा केसरकर म्हणाले, ""गेली बरीच वर्षे सिंधुदुर्गला गोव्यामध्ये मोफत सेवा मिळत होत्या. आताच्या निष्क्रीय सरकारने ही सेवा बंद केली आहे. यापुढे अशीच परिस्थिती राहिल्यास महाराष्ट्र राज्यातून गोव्याला पुरविण्यात येणारा भाजीपाला, मासे, इतर जीवनावश्‍यक वस्तू पाठविण्यात येणार नाही. वेळप्रसंगी राष्ट्रीय महामार्ग रोखला जाईल.'' 

दोन दिवसात निर्णय न घेतल्यास 30 मार्चला जनआंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आला. "गोवा सरकार हाय हाय' म्हणत घोषणा देण्यात आल्या. आंदोलनाच्या ठिकाणी प्रांताधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, माजी आमदार पुष्पसेन सावंत, सभापती राजन जाधव, नगराध्यक्ष विनायक राणे, प्रसाद रेगे, अमित सामंत, अभय शिरसाट, अमरसेन सावंत, संध्या तेरसे, प्रज्ञा राणे, साक्षी सावंत, गणेश भोगटे, सचिन काळप, धीरज परब, बाबल गावडे, दीपक गावडे, सुनील बांदेकर, विकास कुडाळकर, संजय पडते, दीपक नारकर, बाळा वेंगुर्लेकर, संजय भोगटे, राजन नाईक, आबा मुंज, प्रकाश जैतापकर, श्रेया गवंडे, राजू गवंडे, बाळ कनयाळकर, अजय आकेरकर, भास्कर परब, शिवाजी घोगळे, अस्मिता बांदेकर, सतीश कुडाळकर, प्रसाद गावडे आदी उपस्थित होते. 
 
Web Title: Sindhudurg News Health issue in Kudal