मालवण, वेंगुर्ला, देवगड भागात पावसामुळे पुरस्थिती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

मालवण - मालवण, वेंगुर्ला, देवगड भागात काल संध्याकाळपासून ते मध्यरात्रीपर्यंत मुसळधार पाऊस कोसळला. या पावसात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. तर काही घरात पाणी शिरले आहे. पावसामुळे झाडे पडण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

मालवण बंदर जेटीनजीक पहाटेच्या सुमारास  मालवणकर यांचे घर कोसळले. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. पावसामुळे या घरातील नम्रता व सायली मालवणकर या भगिनी  नातेवाईकांकडे राहावयास गेल्या होत्या.

पेट्रोल पंप समोरील अरुण चव्हाण यांच्या दुकानावर झाड कोसळून नुकसान झाले आहे. दांडी, वायरी, आडवण भागात काही घरांमध्ये पाणी घुसले आहे. तर बाजारपेठेत पाणी शिरल्याने दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

कसाल-मालवण राज्यमार्गावर देऊळवाडा येथे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. देउळवाडा - डम्पिंग ग्राउंड - फोवकांडा पिंपळपार मार्गे मालवण अशी वाहतूक करावी लागत आहे. 

Web Title: Sindhudurg News Heavy Rains in Konkan