पावसाने वेंगुर्लेत खेकडा प्रकल्पाची 4 लाखाची हानी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

वेंगुर्ले - शहरात पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका येथील खेकडा प्रकल्पाला बसला आहे. खेकड्याच्या आगरामध्ये पाणी गेल्याने खेकडे वाहून जाणे आणि खेकडे मृत्यूमुखी पडणे अशा प्रकारांमुळे या प्रकल्पाचे सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

येथील मांडवी खाडी किनाऱ्यावर गेले तीन वर्षे साई सावली स्वयंसहाय्यता बचतगट खेकडा प्रकल्प पालिकेच्या रामदास आगरात चालवत आहे. शहरात पडलेल्या मुसळधार पावसाचे पाणी आगराच्या तिन्ही बाजुने आतमध्ये आले व खाडीमधील पाण्याचे प्रमाण हे आगरापेक्षा जास्त असल्याने आगरातील पाणी बाहेर जाण्याऐवजी चिखलाचे लाल गोडे पाणी आत आगरा मधेच राहून बंधारे पाण्याखाली गेले. त्यामुळे खेकडे व मासे हे पाण्याच्या प्रवाहाद्वारे वाहुन गेले व काही मृत्यूमुखी पडले. मुसळधार पावसामुळे प्रकल्पामध्ये सोडलेले खेकडे, मासे आणी खेकड्याना देण्यात आलेले खाद्य असे सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

Web Title: Sindhudurg News Heavy Rains in Vengurle

टॅग्स