केरळीयनांच्या अनधिकृत वृक्षतोडीमुळे डोंगर बोडके 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

सावंतवाडी - केरळीयन लोकांनी केलेल्या अनधिकृत आणि बेसुमार वृक्षतोडीमुळे जिल्ह्यातील डोंगर बोडके झाले आहेत. त्याचा फटका प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लाकूड व्यवसायिकांना सहन करावा लागत आहे, असा आरोप सावंतवाडी दोडामार्ग व्यवसायिक संघटनेच्यावतीने आज येथे करण्यात आला. 

सावंतवाडी - केरळीयन लोकांनी केलेल्या अनधिकृत आणि बेसुमार वृक्षतोडीमुळे जिल्ह्यातील डोंगर बोडके झाले आहेत. त्याचा फटका प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लाकूड व्यवसायिकांना सहन करावा लागत आहे, असा आरोप सावंतवाडी दोडामार्ग व्यवसायिक संघटनेच्यावतीने आज येथे करण्यात आला. 

संघटनेच्या विविध मागण्यांसाठी पदाधिकाऱ्यांनी आज येथील वनविभागाचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांची भेट घेतली. त्यानंतर येथील पर्णकुटी विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मंगेश तळवणेकर, बाबी बोर्डेकर, कृष्णा पालेकर, अजित चांदेकर, संजय निंबाळकर, शिवाजी गवस, आनंद राघू फटकारे, पांडुरंग गवस, काशिनाथ शेटकर आदी उपस्थित होते. 

यावेळी तळवणेकर म्हणाले, ""गेल्या काही वर्षांत विशेष सावंतवाडी-दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या केरळीयन लोकांकडून मोठ्या प्रमाणात डोंगर बोडके करण्यात आले आहे. याला काही जिल्ह्यातील तत्कालीन वनविभाग अधिकारी जबाबदार आहेत; मात्र त्याचे खापर आमच्या डोके फोडले जात आहे. प्रामाणिकपणे धंदा करणाऱ्या आमच्यासारख्या व्यवसायिकांना नाहक त्रास दिला जात आहे. हा प्रकार चुकीचा आहे. डोंगर बोडके करणारी तसेच बेकायदा जंगलतोड करणारे कोण ? याचा शोध घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आता वन अधिकाऱ्यांनी योग्य ती भूमिका घ्यावी.'' 

बोर्डेकर म्हणाले,""खारफुटी व अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या आंबा-काजू बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावर शासनाने तातडीची उपाय योजना राबवून नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा शेतकरी बागायतदार व लाकूड व्यवसायिक संघटना तीव्र आंदोलन उभारेल. दोडामार्ग तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात हत्तींनी धुडगूस घातला आहे. यात शेतकऱ्यांच्या बागायती उध्वस्त होत आहेत. यावर या हत्तींचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना यापासून दिलासा द्यावा.'' 

गोडसे म्हणाले, ""हजारो एकर काजू आंबा बागायत लावायची असल्यास झाडीचे जंगल तोडनेही, गरजेचे असते. अशा विविध क्षेत्रांत बंदी घालून वनविभागाने कायद्याचा नाहक बडगा घालू नये.'' 

Web Title: Sindhudurg News illegal tree cutting issue