आंबोली पर्यायी रस्त्याचा तिढा सुटणार

अमोल टेंबकर
मंगळवार, 15 मे 2018

सावंतवाडी - आंबोली घाटाला पर्याय ठरणाऱ्या केसरी-फणसवडे-चौकुळ या रस्त्यासाठी लागणाऱ्या जमिनीचे प्रस्ताव पंधरा दिवसांत संबंधित खात्याकडे दाखल करण्यात येणार आहे. त्यात खासगी, वनजमीन आणि वनसंज्ञा क्षेत्राचा समावेश आहे.
बजेटमध्ये या रस्त्यासाठी एक कोटी ७५ लाखांची तरतूद केल्यानंतर याबाबतचे प्रस्ताव तयार करण्यास गती मिळाली.

सावंतवाडी - आंबोली घाटाला पर्याय ठरणाऱ्या केसरी-फणसवडे-चौकुळ या रस्त्यासाठी लागणाऱ्या जमिनीचे प्रस्ताव पंधरा दिवसांत संबंधित खात्याकडे दाखल करण्यात येणार आहे. त्यात खासगी, वनजमीन आणि वनसंज्ञा क्षेत्राचा समावेश आहे.
बजेटमध्ये या रस्त्यासाठी एक कोटी ७५ लाखांची तरतूद केल्यानंतर याबाबतचे प्रस्ताव तयार करण्यास गती मिळाली. या रस्त्याशी संबंधित प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश बच्चे यांनी दिली. 

याबाबत श्री. बच्चे म्हणाले, ‘‘आंबोली घाट कोसळून सहा ते सात वर्ष पूर्ण झाली; मात्र हा घाट रस्ता संस्थानकालीन असल्याने दरी खोऱ्यात आणि उंच टेकड्यांच्या ठिकाणी मजबुतीकरण करणे जोखमीचे आहे. तरी बांधकाम विभागातर्फे अपघात टाळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या रस्त्याच्या कामाला आता गती मिळाली आहे. १८ किलोमीटर असलेल्या त्या रस्त्याच्या जमीन संपादनासाठी एक कोटी ७५ लाख रुपयांचा निधी खात्याला मिळाला आहे. जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 

रस्त्यासाठी ताब्यात घेण्यात येणाऱ्या जमिनीचा ले आऊट आणि अन्य प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात काही जमीन ही वनसंज्ञा आणि वनविभागाच्या मालकीची असल्यामुळे ती ताब्यात घेण्यासाठी वनविभागाकडे प्रस्ताव देण्यात येणार आहे. बरीचशी जमीन ही खासगी असल्यामुळे त्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे.

घाट मार्ग निर्धोक
सद्यःस्थितीत वापरात असलेला आंबोली घाटातील रस्ता हा वापरास निर्धोक आहे. त्याठिकाणी कोसळणाऱ्या दरडी, दगड यांच्यासमवेत संरक्षक कठडे मजबूत करण्यात आले आहेत. त्यामुळे तूर्तास तरी हा घाट मार्ग निर्धोक असल्याचे श्री. बच्चे यांनी सांगितले.
 

Web Title: Sindhudurg News issue of alternative road to Amboli