कणकवली नगराध्यक्षपदासाठी ‘चौरंगी’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

कणकवली - कणकवली नगरपंचायतीसाठी निवडणूक लढणाऱ्या १० उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतले. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी चौरंगी, तर प्रभागामध्ये तिरंगी आणि चौरंगी लढती होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

कणकवली - कणकवली नगरपंचायतीसाठी निवडणूक लढणाऱ्या १० उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतले. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी चौरंगी, तर प्रभागामध्ये तिरंगी आणि चौरंगी लढती होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. प्रभाग दहामधील हरकतींवर अद्याप निर्णय झालेला नाही. या प्रभागातील चित्र आज (ता. २७) स्पष्ट होणार आहे.

नगराध्यक्षांसह प्रभागनिहाय उमेदवारांना उद्या (ता. २७) दुपारी अकरापासून निवडणूक चिन्ह वाटप कार्यक्रम सुरू होणार आहे.
प्रभाग १० वगळता कणकवली नगरपंचायतीचे निवडणूक चित्र आज स्पष्ट झाले. यात नगराध्यक्षपदासाठी संदेश पारकर (भाजप), समीर नलावडे (महाराष्ट्र स्वाभिमान), राकेश राणे (गाव आघाडी) आणि विलास कोरगावकर (काँग्रेस) अशी चौरंगी लढत होणार आहे. प्रभाग १० मध्ये शीतल रामदास मांजरेकर आणि स्वाती काणेकर यांचे उमेदवारी अर्ज जातवैधता प्रमाणपत्र नसल्याने फेटाळण्यात आले होते. त्याविरोधात या दोन्ही उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील केले. त्याची सुनावणी आज झाली. तर त्यावरील निर्णय सायंकाळी उशिरा किंवा उद्या (ता. २७) जाहीर होणार आहे. त्यामुळे निकाल लागेपर्यंत हा प्रभाग निवडणूक प्रक्रियेतून वगळण्यात आला आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर या प्रभागातील उमेदवारांना अर्ज माघारी घेण्याची मुदत आणि निवडणूक चिन्हवाटप होणार आहे.
नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरलेल्या अजित यशवंत राणे (गाव आघाडी) आणि अभय अरविंद राणे (अपक्ष) यांनी अर्ज मागे घेतले. तर प्रभाग २ मधून नरेश सीताराम राणे (स्वाभिमान), मनोज कृष्णाजी राणे (गाव आघाडी), प्रभाग ५ मधून राजश्री धुमाळे (अपक्ष), प्रभाग ७ मधून माया सांबरेकर (भाजप), प्रभाग १२ मधून वैशाली आरोलकर (भाजप), प्रभाग १३ मधून प्रशांत मुरलीधर नाईक (अपक्ष) आणि प्रभाग १६ मधून प्रदीप मांजरेकर आणि हिरेन कामतेकर यांनी अर्ज मागे घेतले. प्रभाग १० वगळता नगरसेवक प्रभागासाठी १६ प्रभागांतून ५५ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. 

अशा होणार लढती 
कणकवली नगरपंचायत निवडणुकीचे प्रभागनिहाय अंतिम चित्र असे ः

प्रभाग १ : सुवर्णा चंद्रशेखर राणे (शिवसेना), वैभवी विजय राणे (गाव आघाडी), कविता किशोर राणे (स्वाभिमान).

प्रभाग २ : दिव्या दिनेश साळगावकर (काँग्रेस), साक्षी संतोष आमडोसकर (शिवसेना), संजना संजय सदडेकर (गाव आघाडी), रोहिणी लक्ष्मण पिळणकर (भाजप), प्रतीक्षा प्रशांत सावंत (स्वाभिमान).

प्रभाग ३ : अजित यशवंत राणे (गाव आघाडी), रवींद्र हरी राणे (भाजप), अभिजित भास्कर मुसळे (स्वाभिमान).

प्रभाग ४ : श्रीकृष्ण रमेश निकम (गाव आघाडी), भिवा वसंत परब (काँग्रेस), धोंडू तातू परब (भाजप), अबिद अब्दुल नाईक (राष्ट्रवादी).

प्रभाग ५ : अश्‍विनी गजानन मोरये (शिवसेना), ऋतुजा ऋषिकेश कोरडे (काँग्रेस), मेघा अजय गांगण (स्वाभिमान).

प्रभाग ६ : विजयश्री महेश कोदे (काँग्रेस), सुमेधा सखाराम अंधारी (भाजप), प्रियाली सुरेंद्र कोदे (स्वाभिमान).

प्रभाग ७ : उत्कर्षा उत्तम धुमाळे (भाजप),  सुप्रिया समीर नलावडे (स्वाभिमान).

प्रभाग ८ : वैजू अनंत कांबळे (भाजप), ऊर्मी योगेश जाधव (स्वाभिमान), अर्पिता अमित कांबळे (गाव आघाडी), भक्ती भाई जाधव (अपक्ष).

प्रभाग ९ : मेघा महेश सावंत (भाजप), शैलजा पांडुरंग कदम (अपक्ष),  पूजा संजय राणे (काँग्रेस), दर्शना गणपत चव्हाण (गाव आघाडी), पूजा विनोद सावंत (स्वाभिमान).

प्रभाग १० : माही मंदार परुळेकर (शिवसेना), माधुरी सोमनाथ गायकवाड (स्वाभिमान), प्रिया अमित मयेकर (भाजप) असे छाननीनंतरचे उमेदवार आहेत; मात्र हरकती असल्याने या प्रभागाचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे.

प्रभाग ११ : सुजित प्रकाश जाधव (शिवसेना), महानंद राजाराम चव्हाण (काँग्रेस), लवू लक्ष्मण पवार (भाजप), विराज सुभाष भोसले (स्वाभिमान).

प्रभाग १२ : गौरव भानुदास हर्णे (भाजप), गणेश सोनू हर्णे (स्वाभिमान), शैलेंद्र बबन नेरकर (गाव आघाडी).

प्रभाग १३ : सुशांत श्रीधर नाईक (शिवसेना), विलास बाळकृष्ण कोरगावकर (काँग्रेस), संजय बाबी मालंडकर (स्वाभिमान).

प्रभाग १४ : राधाकृष्ण चंद्रकांत नार्वेकर (भाजप), संजय शांताराम पारकर (शिवसेना), सुरेंद्र सुधाकर कोदे (स्वाभिमान).

प्रभाग १५ : मानसी योगेश मुंज (शिवसेना), ज्योतिका जीवनप्रकाश माणगावकर (स्वाभिमान).

प्रभाग १६ : नरेंद्र नारायण आजगावकर (भाजप), राजेंद्र सुधाकर वर्णे (काँग्रेस), संजय मधुकर कामतेकर (स्वाभिमान), उमेश सहदेव वाळके (अपक्ष).

प्रभाग १७ : विलास पांडुरंग जाधव (शिवसेना), मारुती श्रीधर राणे (गाव आघाडी), सुभाष महादेव चव्हाण (काँग्रेस), रवींद्र बाळकृष्ण गायकवाड (स्वाभिमान)

Web Title: Sindhudurg News Kankavali NagarPanchayat Election