कणकवली नगरपंचायत सभापती निवडी बिनविरोध

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

कणकवली -  कणकवली नगरपंचायतीच्या विषय सभापती निवडी आज बिनविरोध झाल्या. यात बांधकाम समिती सभापतिपदी अभिजित मुसळे, महिला व बालकल्याण सभापतिपदी मेघा गांगण, आरोग्य सभापतीपदी ॲड. विराज भोसले यांची निवड झाली; तर बाजार व पाणीपुरवठा समितीचे सभापती हे पदसिद्ध उपनगराध्यक्ष आहेत.

कणकवली -  कणकवली नगरपंचायतीच्या विषय सभापती निवडी आज बिनविरोध झाल्या. यात बांधकाम समिती सभापतिपदी अभिजित मुसळे, महिला व बालकल्याण सभापतिपदी मेघा गांगण, आरोग्य सभापतीपदी ॲड. विराज भोसले यांची निवड झाली; तर बाजार व पाणीपुरवठा समितीचे सभापती हे पदसिद्ध उपनगराध्यक्ष आहेत.

विषय समिती सभापती निवडीसाठीची विशेष सभा नगरपंचायत सभागृहात आज झाली. सभापती निवडीचे काम प्रांताधिकारी नीता सावंत-शिंदे आणि मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी पाहिले. नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, माही परुळेकर, मानसी मुंज, सुप्रिया नलावडे, मेघा गांगण, कविता राणे, उर्मी जाधव, मेघा सावंत, प्रतीक्षा सावंत, विराज भोसले, संजय कामतेकर, अबिद नाईक, रूपेश नार्वेकर, महेंद्र सांबरेकर, बंडू हर्णे उपस्थित होते.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून श्री.मुसळे, सौ.गांगण आणि श्री.भोसले यांनी अर्ज भरले होते. ते सर्व वैध ठरले. तसेच प्रतिस्पर्धी नसल्याने सर्व सभापती बिनविरोध झाल्याचे प्रांताधिकारी शिंदे यांनी जाहीर केले. तत्पूर्वी स्वाभिमान पक्षाचे गटनेते संजय कामतेकर यांनी चार समित्यांसाठी प्रत्येकी तीन सदस्यांची नावे प्रांताधिकाऱ्यांकडे सादर केली. तर विरोधी पक्षातर्फे रूपेश नार्वेकर यांनी आपल्या गटातील प्रत्येकी दोन सदस्यांच्या नावांची यादी प्रांताधिकाऱ्यांकडे सादर केली होती.  प्रत्येक समितीसाठी एकमेव अर्ज आल्याने निवडी बिनविरोध झाल्या.

सभापती व समिती सदस्य - बांधकाम, विकास व नियोजन समिती- सभापती - अभिजित मुसळे, सदस्य - अबिद नाईक, संजय कामतेकर, सुशांत नाईक, राधाकृष्ण नार्वेकर.

महिला व बालकल्याण समिती सभापती - मेघा गांगण, सदस्य - प्रतीक्षा सावंत, सुप्रिया नलावडे, माही परुळेकर.

आरोग्य, वीज, शिक्षण व क्रीडा समिती- सभापती- ॲड.विराज भोसले, सदस्य - गणेश हर्णे, ऊर्मी जाधव,  मानसी मुंज, मेघा सावंत.

बाजार, पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण समिती - सभापती - रवींद्र गायकवाड, सदस्य - संजय कामतेकर, कविता राणे, सुमेधा अंधारी, मानसी मुंज, रवींद्र गायकवाड.

Web Title: Sindhudurg News Kankavali NagarPanchayat Election