कणकवली नगरपंचायत सभापतींची आज निवड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

कणकवली -  कणकवली नगरपंचायतीच्या विषय समिती सभापतींची निवड प्रक्रिया आज (ता. ६) कणकवली नगरपंचायतीच्या विशेष सभेत होणार आहे. मात्र सभापती निवडीवेळी बहिष्कार टाकण्याचा निर्णय राहण्याचा निर्णय काँग्रेसच्या नलावडे गटातील आठ नगरसेवकांनी घेतला आहे. त्यामुळे सभापतीपदे रिक्‍त राहण्याची शक्‍यता आहे.

कणकवली -  कणकवली नगरपंचायतीच्या विषय समिती सभापतींची निवड प्रक्रिया आज (ता. ६) कणकवली नगरपंचायतीच्या विशेष सभेत होणार आहे. मात्र सभापती निवडीवेळी बहिष्कार टाकण्याचा निर्णय राहण्याचा निर्णय काँग्रेसच्या नलावडे गटातील आठ नगरसेवकांनी घेतला आहे. त्यामुळे सभापतीपदे रिक्‍त राहण्याची शक्‍यता आहे. दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांत राजकीय जुगलबंदी रंगणार आहे.

कणकवली नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक सहा महिन्यानंतर होणार आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या सभापती निवडीनंतर नगरपंचायत निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरवात होणार आहे. १७ सदस्यांच्या कणकवली नगरपंचायतीचे संख्याबळ ॲड. प्रज्ञा खोत अपात्र ठरल्याने १६ झाले आहे. यात काँग्रेस नलावडे गटाचे आठ सदस्य विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहेत. तर शिवसेनेचे ३, भाजप १ आणि काँग्रेस पारकर गटाचे ४ असे आठ सदस्य सत्तेमध्ये आहेत. दोन वर्षापूर्वी झालेल्या नगराध्यक्ष निवडीवेळी काँग्रेस नगरसेवकांमध्ये फुट पडली होती. यात शिवसेना आणि भाजप नगरसेवकांच्या पाठिंब्यावर काँग्रेसच्या पारकर गटाने सत्ता स्थापन केली. 

दीड वर्षापूर्वी कणकवली नगरपंचायतीमध्ये विषय समिती सभापतींच्या निवडी झाल्या होत्या. त्यावेळी गटनेतेपदावरून काँग्रेसच्या दोन गटामध्ये वादंग झाला होता. अखेर चिठ्ठ्या काढून विषय समित्यांचे गठण केले होते. यात बांधकाम समितीमध्ये नलावडे गटाच्या चार सदस्यांचा समावेश झाला. त्यामुळे अभिजित मुसळे यांची बिनविरोध निवड झाली होती. महिला व बालकल्याण समिती सभापती निवडीवेळी ॲड. प्रज्ञा खोत अनुपस्थित राहिल्या. तर पारकर गटाच्या सुविधा साटम अलिप्त राहिल्या. त्यामुळे महिला व बालकल्याण समिती सभापतीपद रिक्‍त राहिले होते. याबरोबरच आरोग्य समिती सभापतीपददेखील सूचक-अनुमोदक नसल्याने रिक्‍त राहिले होते. पाणी पुरवठा समितीचे पदसिद्ध अध्यक्ष उपनगराध्यक्ष असल्याने ही एकमेव समिती गतवर्षी गठित झाली होती. 

यंदा नलावडे गटाच्या आठ नगरसेवकांनी सभापती पदाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. तसेच या सदस्यांनी विषय समित्यांमध्ये आपला समावेश करू नये अशी मागणी मुख्याधिकारी आणि पीठासीन अधिकारी यांचेकडे केली आहे. त्यांची मागणी मान्य झाली तर शिवसेना, भाजप आणि काँग्रेसच्या पारकर गटातील आठ सदस्यांचा समावेशाने सभापती निवडी होऊ शकतात. मात्र विषय समित्यांमध्ये सर्व १६ नगरसेवकांचा समावेश झाला. तर मागील वर्षी प्रमाणे यंदाही विषय समिती सभापतीपदे रिक्‍त राहण्याची शक्‍यता आहे.

Web Title: sindhudurg news Kankavali Nagarpanchayat Sabhapati selection