कणकवलीत दोन शाळकरी मुले नदीपात्रात बुडाल्याची भीती 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

शनिवारी दुपारी साडेतीन वाजता नदीपात्रात मित्रासोबत आंघोळीला गेलेल्या या दोघा शाळकरी मुलांच्या नातेवाईकांनी रात्री शोध सुरू केल्यानंतर ते बेपत्ता असल्याचे पुढे आले.

कणकवली : शहरातील शाळकरी मुलगे दोन मुलगे गडनदी पात्रात बुडाल्याची भीती व्यक्त होत असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी बचाव मोहीम सुरू केली आहे.

शनिवारी दुपारी साडेतीन वाजता नदीपात्रात मित्रासोबत आंघोळीला गेलेल्या या दोघा शाळकरी मुलांच्या नातेवाईकांनी रात्री शोध सुरू केल्यानंतर ते बेपत्ता असल्याचे पुढे आले.

पोलिसांनी आज सकाळपासूून शोधमोहिम तसेच चौकशी सुरू केल्यानंतर सोबत असलेल्या दोघा मित्रांच्या चौकशीमुळे दोघेजण नदीपात्रात बुडाल्याची खात्रीशीर माहिती समजताच सायंकाळी रेस्की ऑपरेशनला सुरूवात झाली. प्रसन्नजीत सुमंगल कुंभवडेकर (वय १६) आणि रामचंद्र दीपक माणगांवकर (वय १४ दोन्ही रा. कणकवली शहर) असे त्या शाळकरी मुलांचे नाव आहे. 

Web Title: sindhudurg news kankavali river drowning