कोकण कृषी विद्यापीठ कुलगुरुंचा राजीनामा 

राजकुमार चाैगुले
शुक्रवार, 1 जून 2018

दापोली - येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. तपस भट्टाचार्य यांनी कुलगुरुपदाचा राजीनामा दिला आहे. शुक्रवारी (ता. 1) सकाळी डॉ. भट्टाचार्य यांनी राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्याकडे राजीनामा फॅक्‍स केला. वैयक्तीक कारणास्तव आपण राजीनामा दिला आहे. तातडीने राजीनामा दिला असला तरी ऑगस्टपर्यत या पदावर कायम रहाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान डॉ. भट्टाचार्य यांच्या राजीनाम्यामुळे विद्यापीठ वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत.

6 नोव्हेंबर 2015 ला त्यांनी कुलगुरु म्हणून पदभार स्विकारला. मुळचे पश्‍चिम बंगालचे असणारे डॉ. भट्टाचार्य यांची बहुतांशी सेवा महाराष्ट्रात झाली आहे. ते कुलगुरु होण्यापूर्वी राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण संस्थेमध्ये संचालक म्हणून काम करत होते. तेथून त्यांची कुलगुरु म्हणून निवड झाली. त्यांचा कुलगुरुपदाचा कार्यकाल 2020 पर्यत होता. विद्यापीठाने नुकतीच जॉइट ऍग्रेस्को परिषद घेतली. या परिषदेचे नियोजन झाल्यानंतर येत्या दहा तारखेला विद्यापीठात पाणी व्यवस्थापनावर राष्ट्रीय कार्यशाळा होणार होती. याच्या नियोजनाची कार्यवाही सुरु असताना त्यानीं राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा दिला असला तरी ते ऑगस्टपर्यत ते कामावर असणार असल्याने नियोजित कार्यक्रमावर त्याचा फारसा परिणाम होणार नसल्याचे विद्यापीठातील सुत्रांनी सांगितले.

राजीनाम्यासाठी कोणतेही कारण चर्चेत नसताना त्यांनी मुदतपूर्व राजीनामा दिल्याने नेमक्‍या कारणाबाबत विद्यापीठ परिसरात तर्कवितर्क सुरु होते. 

Web Title: Sindhudurg News Konkan Agriculture University Vic-chancellor resign