कोकण पदवीधरः शिवसेनेचे भाजपसमोर तगडे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

वैभववाडी - भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोकण पदवीधर मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे यांनी भाजपसमोर तगडे आव्हान निर्माण केले आहे. पुर्ण ताकदीने या निवडणुकीत शिवसेना उतरल्यामुळे भाजपलाही ताकद पणाला लावावी लागत आहे. निवडणुक चुरशीची होणार असल्यामुळे जिल्ह्यातील पदवीधर मतदारांना महत्व आल्याचे चित्र देखील पाहायला मिळत आहे.

गेल्यावेळीचा अपवाद वगळता कोकण पदवीधर मतदारसंघात सतत भाजपने बाजी मारली आहे. भाजपची विजयी घौडदौड गेल्या वेळी निरंजन डावखरे यांनी रोखली होती. पण यंदा निवडणुक जाहीर होण्यापुर्वी काही दिवस अगोदरच डावखरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला व उमेदवारी मिळविली. शिवसेनेने या मतदारसंघात ठाण्यातील माजी महापौर संजय मोरे या सक्षम उमेदवाराला रिंगणात उतरवत कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीची रंगत वाढविली आहे. याशिवाय राष्ट्रवादीने नजीब मुल्ला रिंगणात आहेत. हे तीन उमेदवार ठाण्यातील आहेत. तिघांचाही आपआपल्या भागात प्रभाव आहे. त्यामुळे तेथील मतदान एकाच उमेदवारांच्या पारड्यात जाण्याची शक्‍यता कमी आहे. त्यामुळे सर्व पक्षाच्या उमेदवारांनी इतर जिल्ह्याकडे अधिक लक्ष केंद्रीत केले आहे.

शिवसेनेने मोरे यांना उमेदवारी देवुन पदवीधर मतदारसंघात भाजपसमोर कडवे आव्हान निर्माण केले आहे. शिवसेनेची संघटनात्मक शक्ती या निवडणुक प्रचारात उतरली आहे. शिवसेनेचे मंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुखांसह यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचारात गुंतले आहेत. प्रत्यक्ष भेटुन आणि फोन करून मतदारांनी संपर्क साधण्यात येत आहे.

Web Title: Sindhudurg News Konkan Graduate constituency election report