शिवसेनेच्या पराभवाची भाजपची रणनीती?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

सावंतवाडी - पालघरमध्ये शिवसेनेने केलेल्या खेळीने भाजपचे वरिष्ठ नेते चांगलेच चिडले आहेत. त्यामुळे विधान परिषदेसाठी कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार पाडण्याचे आदेशच स्थानिक कार्यकर्त्यांना दिल्याचे समजते. राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे यांना मतदान करावे, असा अप्रत्यक्ष संदेशच पक्षाने काढल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. येथे भाजपची सुमारे १६० मते आहेत.

येथे शिवसेनेची चहूबाजूनी कोंडी होत आहे. काही दिवसांपूर्वी खासदार नारायण राणे यांनी स्वाभिमान पक्षाचा श्री. तटकरे यांना पाठिंबा जाहीर केला. मनसेची मते राष्ट्रवादीकडेच जाण्याची शक्‍यता आहे. अंतर्गत कलहाने अडचणीत आलेल्या श्री. तटकरेंना थोडासा दिलासा मिळाला होता; परंतु दोन दिवसातील घडामोडी श्री. तटकरेंना सुखद धक्का देणाऱ्या ठरणार आहेत.

पालघर येथे लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेने राजकीय खेळी करत भाजपचे दिवंगत खासदार (कै.) चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास यांना पक्षात घेत उमेदवारी दिली. यामुळे भाजप नेते चांगलेच भडकले आहेत. त्यामुळे कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत त्यांनी शिवसेनेला मदत न करण्याच्या सूचना दिल्याची चर्चा आहे.

त्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर गुप्त बैठक झाली असून भाजपाची १६० मते राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांच्या पारड्यात टाकण्याच्या दृष्टीने व्यूहरचना सुरू आहे. भाजपाचे हे पाऊल शिवसेनेचे उमेदवार ॲड. राजीव साबळे यांची डोकेदुखी वाढविणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. शिवसेनेला भाजपची मते मिळाली असती तर विजयासाठी आवश्‍यक मॅजिक फिगर गाठणे सहज शक्‍य झाले असते. शिवसेनेकडे सुमारे २९१ तर भाजपची १६० अशी ४५१ मते होती. याशिवाय अन्य काही मते शिवसेनेच्या पारड्यात पडली असती; परंतु भाजपने टाकलेले पाऊल शिवसेनेसाठी अडचणीचे आहे.

पाठिंबा किंवा विरोधाचा प्रश्‍नच नाही!
भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल काळसेकर म्हणाले, ‘‘शिवसेना उमेदवाराविरोधात मतदान किंवा त्यांना पाठिंबा देण्याबाबतचा कुठलाच निर्णय भाजप बैठकीत झाला नाही. किंबहुना त्याची आवश्‍यकता देखील नाही. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या संपूर्ण प्रचारात शिवसेना नेते-पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षांचीही भेट घेतलेली नाही किंवा पाठिंबा देखील मागितलेला नाही. त्यांचे सर्व काही स्वबळावर चाललेले आहे. त्यामुळे आमचा पाठिंब्याचा किंवा विरोधाचा प्रश्‍नच येत नाही.’’

Web Title: Sindhudurg News Konkan Legislative Council election